नवी दिल्लीः जर तुम्हाला नवा स्मार्ट एलईडी टीव्ही किंवा अँड्रॉयड टीव्ही खरेदी करायचा असेल तर २४ फेब्रुवारीपासून रियलमीच्या अधिकृत वेबसाइट रियलमी डॉट कॉम वर रियलमी सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक प्रोडक्टवर ग्राहकांना सूट मिळणार आहे. परंतु, आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या टीव्ही मॉडलवर डिस्काउंट मिळणार आहे. याची माहिती देत आहोत. या सेलमध्ये ३२ इंच, ४३ इंच आणि ५५ इंचाच्या टीव्ही मॉडल्सवर तुम्हाला सूट मिळणार आहे. वाचाः ३२ इंच स्मार्ट टीव्ही जर तुमचे बजेट १५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर रियलमी टीव्ही मॉडलवर १ हजार रुपयांची सूट मिळेल. या डिस्काउंट नंतर या टीव्ही मॉडलला १३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. आता या टीव्हीची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. या टीव्हीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात बेजल लेस अल्ट्रा, ब्राइट एलईडी डिस्प्ले, क्रोमा बूस्ट पिक्चर इंजिन, २४ वॉट क्वॉड स्टीरियो स्पीकर्स, बिल्ट इन क्रोमकास्ट, गुगल असिस्टेंट आणि ६४ बिट क्वॉड कोर प्रोसेसर सोबत १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज आहे. वाचाः ४३ इंच स्मार्ट टीव्ही २५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत टीव्ही खरेदी करायचा असेल तर रियलमीच्या या सेलमध्ये १ हजार रुपयांची सूट मिळते. या डिस्काउंटनंतर २२ हजार ९९९ रुपयांत ४३ इंच स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. या टीव्हीची सध्याची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे. या टीव्हीत ३२ इंचाचे सर्व फीचर्स पाहायला मिळतील. वाचाः ५५ इंच अँड्रॉयड टीव्ही घर किंवा ऑफिसात मोठी स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर २४ फेब्रुवारी पासून रियलमी सेलमध्ये या टीव्हीला ३ हजार रुपयांच्या सूट सोबत खरेदी करू शकता. ४२ हजार ९९९ रुपये किंमत असलेला टीव्ही ३९ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. हा टीव्ही जगातील आणि रियलमी ब्रँडचा पहिला स्मार्ट एसएलईडी मॉडल आहे. या टीव्हीत सिनेमॅटिक डिस्प्ले दिला आहे. क्वॉड कोर चिपसेट दिला आहे. २४ वॉट क्वॉड स्टीरियो स्पीकर या टीव्ही मॉडलमध्ये मिळते. जे डॉल्बी टेक्नोलॉजी सोबत येते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bCzxmO