नवी दिल्लीः OPPO F सीरीजची जबरदस्त एन्ट्री होणार आहे. प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी लवकरच भारतात OPPO F19 सीरीजचे मोबाइल लाँच करणार आहे. आतापर्यंत या सीरीजमध्ये किती फोन लाँच होणार हे उघड झाले नव्हते. परंतु, आता ओप्पोच्या या अपकमिंग मोबाइल सीरीजसंबंधी एक पोस्टर लीक झाले आहे. या माहितीनुसार, ओप्पो एफ १९ सीरीजमध्ये OPPO F19, OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro+ 5G सारखे स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. ओप्पोच्या या अपकमिंग स्मार्टफोन सीरीजला फेब्रुवारी महिन्यात लाँच करण्यात येणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. वाचाः ३ फोन ३ खास वैशिष्ट्ये OPPO F19 सीरीजच्या मोबाइल्स संबंधी लीक पोस्टर मध्ये याच्या २ फोन ची झलक सुद्धा दिसली आहे. MySmartPrice वर स्मार्टफोन्सशी संबंधीत माहिती समोर आली आहे. ओप्पोच्या या जबरदस्त सीरीजच्या टॉप मॉडल OPPO F19 Pro+ ला केवळ 5G कनेक्टिविटी सोबत लाँच करण्यात येणार आहे. बाकीच्या दोन्ही फोनला ४ जी कनेक्टिविटी सोबत लाँच केले जाणार आहे. लीक पोस्टरच्या माहितीनुसार, ओप्पो एस १९ सीरीजमध्ये एक मोबाइलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि एकात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप पाहायला मिळू शकतो. वाचाः काय खास असणार या फोनमध्ये Oppo F19 मध्ये ६.४ इंचाचा अमोलेड डिस्प्ले असू शकतो. याचा स्क्रीन रिझॉल्यूशन चांगला असू शकतो. अँड्रॉयड ११ वर बेस्ड या फोनमध्ये पॉवरफुल प्रोसेसर पाहायला मिळू शकतो. तर या सीरीजच्या फोनमध्ये 4,310mAhची बॅटरी मिळू शकते. जी 30W VOOC फ्लॅश चार्जिंग सपोर्ट सोबत येईल. ओप्पो एफ १९ सीरीजच्या मोबाइलमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सरचा क्वॉड आणि ट्रिपल रियर कॅमेरा पाहायला मिळू शकतो. ज्यात वाइड अँगल, मोनोक्रोम आणि मायक्रो लेन्स पाहायला मिळू शकतो. या सीरीजच्या मोबाइलमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pPBvp1