Full Width(True/False)

Amazon, Flipkart ला टक्कर देण्यासाठी आले देसी Bharat e Market अॅप

नवी दिल्लीः Amazon आणि Flipkart या ई-कॉमर्स वेबसाइटला टक्कर देण्यासाठी देसी ई-कॉमर्स पोर्टल आले आहे. जवळपास ८ कोटी व्यापाऱ्यांची संघटन Confederation of All India Traders (CAIT) ने ‘Bharat e Market अॅपला लाँच केले आहे. CAIT ने या अॅपद्वारे Amazon आणि Flipkart वर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. या अॅपला भारतीय मूळ असल्याचा सपोर्ट मिळू शकतो. तसेच आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडियाचा फायदा मिळू शकतो. वाचाः CAIT ने आपल्या ट्विटर हँडलवरून Bharat e Market अॅपच्या लाँचिंगची माहिती दिली आहे. CAIT च्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला या प्लॅटफॉर्मवर ४० हजार छोटे मोठे असोशियशन जोडले आहेत. ज्यात एकूण ८ कोटी व्यापाऱ्यांचा समावेश आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या मोबाइल अॅप ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्होकल फॉर व्हिजन अंतर्गत तयार करण्यात आले आहे. या अॅपला Google Play आणि App Store या दोन्ही ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. CAIT च्या म्हणण्यानुसार Android साठी अॅप उपलब्ध आहे. iOS साठी Coming Soon लिहिले आहे. वाचाः भारतीय ई-कॉमर्स अॅप Bharat e Market बिजनेस-टू-बिजनेस (B2B) आणि बिजनेस-टू-कंज़्यूमर (B2C) दोन्ही प्रकारच्या देवाण घेवाण साठी आहे. CAIT चा दावा आहे की, डिसेंबर २०२१ पर्यंत या प्लॅटफॉर्मवरून ७ लाख ट्रेडर्स आणि डिसेंबर २०२३ पर्यंत १ कोटी ट्रेडर्स जोडण्याची अपेक्षा आहे. असे झाले तर जगातील सर्वात मोठे पोर्टल बनेल. वाचाः Bharat e Market बिजनेस करण्यासाठी मोबाइल अॅप किंवा पोर्टल द्वारे रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते. CAIT च्या दाव्यानुसार, हे अॅप पूर्णपणे देसी अॅप आहे. त्यामुळे यातील डेटा देशाबाहेर जाणार नाही. तसेच यावर चिनी सामान विकता येणार नाही. तसेच सामान विकण्यासाठी कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eDjKHE