Full Width(True/False)

ठरलं! 'या' देशात रंगणार रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी'चा थरार

मुंबई- कलर्स हिंदी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम संपल्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे ती आणखी एका प्रसिद्ध कार्यक्रमाची तो म्हणजे 'खतरों के खिलाडी'. लवकरच या कार्यक्रमाचं ११ वं पर्व सुरु होणार असून कार्यक्रमाच्या चित्रीकरणाची तयारीदेखील पूर्ण झाली आहे. 'खतरों के खिलाडी' चं मागचं पर्व अत्यंत हिट ठरल्याने या वेळेसही प्रेक्षकांसाठी काय अनोखं घेऊन येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतेय. या पर्वात सहभागी होण्यासाठी कार्यक्रमाच्या निर्मात्यांतर्फे अनेक कलाकारांना विचारणा करण्यात आली आहे. त्यातील काहींनी त्यांना होकार कळवला आहे तर काहींचे निर्णय अजूनही बाकी आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, '' चं चित्रीकरण करण्यासाठी जागेची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे निर्माते यावेळेस अबू धाबी येथे चित्रीकरण करण्याच्या विचारात आहेत. करोना महामारीच्या दिवसांमध्ये निर्मात्यांना अबू धाबी चित्रीकरणासाठी योग्य जागा वाटत आहे. निर्मात्यांनी या जागेवर शिक्कामोर्तब केलं नसलं तरीही कार्यक्रमाचं ८० टक्के चित्रीकरण येथे केलं जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'खतरों के खिलाडी ११' चं चित्रीकरण पुढील महिन्यापासून सुरू करण्यात येणार असून योग्य परिस्थिती पाहून कार्यक्रमाची टीम पुढील महिन्याच्या सुरुवातीला अबू धाबीसाठी रवाना होणार आहे. या कार्यक्रमाचं चित्रीकरण १५ एप्रिल पासून २५ मे पर्यंत होणार आहे. मागील पर्वात निर्मात्यांनी चित्रीकरणासाठी बल्गेरियाची निवड केली होती. तिथे अत्यंत कठीण टास्क देत रोहित यांनी स्पर्धकांची झोप उडवली होती. मागील पर्वताप्रमाणे हे पर्व देखील मजेशीर त्यासोबत भीतीदायक असणार का याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2NTWnP7