मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस भूमिकांसाठी ओळखली जाते. आहनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एका लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. आहनानं हे फोटोशूट भारतीय महिला क्रिकेट टीममधली वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या गेटअपमध्ये केलं आहे. पण हे फोटो शेअर करताच आहनाला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे. या फोटोंमध्ये तिनं केलेल्या मेकअपमुळे तिच्यावर टीका होताना दिसत आहे. आहाननं झुलन गोस्वामीच्या गेटअपमधील हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. हे फोटो शेअर करताना लिहिलं, 'मी कोणताही चित्रपट प्रमोट करत नाही आहे. हे फक्त त्या महिलेच्या सन्मानासाठी आहे. जिच्यासोबत मी बराच काळ घालवला, तिला आणि तिच्या संघर्षाला जाणून घेतलं. खेळाप्रती निष्ठा पाहिल्यावर मला तिचं खूप कौतुक करावं असं वाटलं. झुलन गोस्वामीला भारतील महिला संघातील इतर खेळाडू झुलन दीदी म्हणून हाक मारतात. टीममधील सर्वच तिचा आदर करतात. ही फोटो सीरिज हा माझ्याकडून तिला दिलेला आदर आहे. आशा करते की, अभिनेत्री म्हणून आपणी सर्व रुढी परंपरांच्या पलिकडे जाऊन दमदार कथा प्रेक्षकांसमोर मांडू.' ही पोस्ट शेअर केल्यानंतर आहना कुमरावर सोशल मीडियावरून जोरदार टीका करण्यात आली. हे फोटोशूट करताना आहनानं मेकअपच्या मदतीनं स्वतःचा चेहरा सावळा केला आहे. एका युझरन लिहिलं, चेहरा काळा दाखवून तू तिचा अपमान केला आहेस. दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, स्वतःला मेकअपच्या मदतीनं सावळं दाखवून काय सन्मान दिला आहे. व्वा! तू एक टक्का सुद्धा तिच्यासारखी दिसत नाहीस. त्यामुळे हा तिच्यासाठी सन्मान नाही तर तू दिग्दर्शकांना सुचवत आहेस की, तिच्यावर एखाद्या चित्रपटाची निर्मिती व्हावी आणि त्याची मुख्य भूमिका तुला मिळावी. किंवा तू तिची खिल्ली उडवत आहेस. दरम्यान या फोटोशूटनंतर आहना कुमराला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात असलं तरीही झुलन गोस्वामीनं मात्र तिचं कौतुक केलं आहे. या फोटोंवर कमेंट करताना तिने लिहिलं, 'खूप छान, असंच काम करत राहा' आहनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती अखेरची 'सँडविच फॉरएव्हर' या वेब सीरीजमध्ये दिसली होती. याव्यतिरिक्त मागच्या वर्षी तिचे चित्रपट 'खुदा हाफिज', 'मर्जी', 'रूल्स ऑफ द गेम्स' आणि बेताल ही वेब सीरिज रिलीज झाली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3f4qCxR