मुंबई ः रुमी जाफरी दिग्दर्शित 'चेहरे' या बहुचर्चित सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. या सिनेमात पहिल्यांदाच आणि एकत्र दिसणार असून दोघांचीही यात प्रमुख भूमिका आहे. या दोघांनाही या सिनेमाबद्दल खूपच उत्सुकता आहे. या सिनेमाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसादही दिला आहे. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन एका वकीलाची भूमिका साकारत आहेत. तर इम्रान हाश्मी एका अॅड एजन्सीच्या मालकाची भूमिका करत आहे. या दोघांव्यतिरीक्त या सिनेमात अन्नू कपूर, क्रिस्टल डिसुजा, धृतिमान चटर्जी, रघुबीर यादव,सिद्धांत कपूर आणि रिया चक्रवर्ती हे कलाकार आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन यांना या भूमिकेसाठी का निवडले, असा प्रश्न रुमी यांना विचारला असता ते म्हणाले की, ' बॉलिवूडमधील प्रत्येक कलाकाराला, दिग्दर्शकला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असते. माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच त्यांच्यासोबत लेखक म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. ते वर्ष होते २००८ आणि आता मी त्यांना घेऊन एक सिनेमा केला आहे. अमिताभ बच्चन यांनी मी दिग्दर्शित केलेल्या सिनेमात काम करणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. ' रुमी पुढे म्हणाले की, 'अमितजींसोबत काम करताना ते कोणताही बडेजाव मिरवत नाहीत. आपल्या बरोबर काम करणा-या प्रत्येकाशी ते मिळून मिसळून वागत असल्याने सर्वजण अतिशय कम्फर्ट लेव्हलवर काम करतात. त्यामुळे आपण एखाद्या दिग्गज कलाकारासोबत काम करत असल्याचा कोणताही तणाव तुम्हाला जाणवत नाही. अमितजी स्वतःच आपल्या सह कलाकारासोबत बाँडिग तयार करतात. त्यामुळे चित्रिकरण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात होते. ' इम्रान हाश्मीच्या निवडीबद्दल रूमी यांनी सांगितले की, 'या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मी इम्रानसोबत काम करत आहे. सिनेमातील या कॅरेक्टरबद्दल जेव्हा जेव्हा मी विचार करायचो तेव्हा तेव्हा इम्रान याचाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर यायचा. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही कलाकाराचा विचार मी करूच शकलो नाही. तोच या रोलसाठी परफेक्ट होता. इम्रान हा अतिशय गुणी आणि शिस्तीचा कलाकार आहे. आपले डायलॉग आणि सिन्ससाठी तो नेहमीच तयारीत असतो. सेटवरील सर्वात जास्त फोकस असलेला तो एक उत्तम कलाकार आहे. ' दरम्यान, आनंद पंडित यांची निर्मिती असलेला हा सिनेमा ९ एप्रिल २०१२१ मध्ये सर्व थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31dzDN3