नवी दिल्लीः लाँच करण्यात आली आहे. ही गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Amazfit T-Rex स्मार्टवॉचचे अपग्रेडेड वेरियंट आहे. नवीन वॉच मध्ये वॉटर रेजिस्टेंस आणि हेल्थ ट्रॅकिंग दिली आहे. सिंगल डायल साइज आणि तीन कलर ऑप्शन सोबत येणारी या वॉचला MIL STD 810 G सर्टिफिकेशन मिळाली आहे. याचा अर्थ असा की, या वॉचने मिलिट्री ग्रेडच्या १५ टेस्टला पास केले आहे. अमेरिकेत या वॉचची किंमत 179.99 डॉलर (जवळपास १३ हजार रुपये) आहे. वाचाः अमेजफिट T-Rex प्रोचे फीचर स्मार्टवॉचमध्ये 360x360 पिक्सल रेजॉलूशनच्या सोबत 1.3 इंचाचा ऑल्वेज-ऑन एचडी AMOLED डिस्प्ले दिला आहे. ही वॉच 10ATM वॉटर रजिस्टेंस सोबत येते. या वॉच मध्ये जबरदस्त हेल्थ ट्रैकिंग साठी BioTracker 2 PPG बायो-ट्रॅकिंग ऑप्टिकल सेंसर , हार्ट रेट ट्रॅकिंग, स्लीप मॉनिटरिंग, थ्री-ऐक्सिस ऐक्सेलरेशन सेंसर, जायरोस्कोप सेंसरच्या शिवाय, अनेक सेंसर दिले आहे. वॉचचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात रनिंग, सायकलिंग, स्विमिंग आउटडोर आणि इनडोर स्पोर्ट्स सह 100 स्पोर्ट्स मोड दिले आहेत. वाचाः वॉच मध्ये दोन्ही बाजुंनी दोन दोन बटन दिले आहेत. कनेक्टिविटीसाठी यात ब्लूटूथ ५.० आमि जीपीएस मिळते. वॉचला कंपनीने तीन कलर ऑप्शन डेजर्ट ग्रे, मीटियोराइट ब्लॅक आणि स्टील ब्लू कलर ऑप्शन मध्ये आणले आहे. वॉच मध्ये 390mAh बॅटरी दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, याला चार्ज होण्यासाठी १.५ तास वेळ लागतो. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जवर ही वॉच १८ दिवसांपर्यंत बॅटरी बॅक अप देते. कंपनी Amazfit T-Rex Pro ला भारतात कधीपर्यंत लाँच करणार यासंबंधी कंपनीने अद्याप काही माहिती दिली नाही. परंतु, अॅमेझॉन इंडिया आणि अमेजफिटच्या ऑनलाइन स्टोरवर ही वॉच नोटीफाइ बटन सोबत लिस्ट करण्यात आली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3shtBH3