नवी दिल्लीः सध्या रोज टेक्नोलॉजीत बदल होताना दिसत आहे. त्यामुळे अवघ्या पाच महिन्यात नवीन फोन जुना फोन वाटायला लागतो. कारण, मोबाइल कंपन्या आपल्या मोबाइल फोनमध्ये काही ना काही तरी नवीन अपडेट देत असते. नवीन फीचर्स देत असल्याने काही महिन्यापूर्वी घेतलेला स्मार्टफोन आपल्याला जुना वाटायला लागतो. नवीन फोन खरेदीच्या नादात आपण अनेकदा आपण स्वस्त किंमतीत आपला जुना फोन देत असतो. परंतु, आज आम्ही तुम्हाला ठिकाणी काही वेबसाइट्स संबंधी खास माहिती देत आहोत. या वेबसाइटवर जुने फोन खरेदी करण्यात येत असून फोनची किंमत सुद्धा चांगली मिळते. या ठिकाणी फोन खरेदी करू शकता आणि विकू शकता. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः कॅशिफाय या वेबसाइटवर तुम्हाला फोनची किंमत चांगली आहे. स्मार्टफोन्स मध्ये अन्य साइटच्या तुलनेत खूप चांगली किंमत मिळते. www.cashify.in वर तुम्हाला टीव्ही, मोबाइल लॅपटॉप, टॅबलेट, आयमॅक आणि गेमिंग कन्सोल विकण्याचे पर्याय दिले आहे. जे प्रोडक्ट विकायचे आहे. त्यावर क्लिक करायचे आहे. वाचाः कर्मा रिसायक्लिंग या ठिकाणी आपल्या जुन्या आणि डिफेक्टिव स्मार्टफोन, टेबलेट सारखे गॅझेट सोप्या पद्धतीने विकले जात आहे. www.karmarecycling.in वर आतापर्यंत ३ लाख, ६० हजार गॅझेट्सची खरेदी विक्री करण्यात आली आहे. यासठी कोटी कोटी रुपयांहून जास्त पेमेंट करण्यात आली आहे. वाचाः इंस्टाकॅश https://getinstacash.in/वर आपले कोणतेही जुने गॅझेट तुम्ही आरामात विकू शकतात. या ठिकाणी बुकिंग झाल्यानंतर कंपनी कर्मचारी स्वतः घरी येऊन आपला फोन घेऊन जातील आणि फोनचे पैसे देतील. यांत्रा www.yaantra.com वर तुम्ही तुमचे जुने गॅझेट विकू शकतात. चांगली किंमत तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते. कंपनीचा दावा आहे की, त्यांच्या वेबसाइटवर केवळ ६० सेकंदात जुने फोन विकत घेतले जातात. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39k6LY9