Full Width(True/False)

अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा'वर यंदा होळी सेलिब्रेशन नाही, काय आहे कारण?

मुंबई: सध्या देशात करोनाची दुसरी लाट आली असून यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. खासकरून महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढताना दिसत आहे. ज्यामुळे मुंबई महानगरपालिकेनं शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच बॉलिवूडकरांच्या खासगी स्वरुपाच्या होळी सेलिब्रेशन पार्टीवरही बंदी घातली आहे. २९ मार्चच्या होळी सेलिब्रेशनसाठी बीएमसीनं नवे नियम लागू केले आहे. त्यानंतर आता या वर्षी बच्चन कुटुंबीयांच्या जलसा बंगल्यावरील होळी सेलिब्रेशनही रद्द करण्यात आल्याचं समजत आहे. आणि फॅमिली बॉलिवूडमध्ये होणारी होळी पार्टी चर्चेत असते . मागच्या अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन यांच्या जलासा बंगल्यावर भव्यदिव्य स्वरुपाचं होळी सेलिब्रेशन होत आहे. ज्यात अनेक बॉलिवूड कलाकार हजेरी लावतात. पण २०२० प्रमाणे यंदाही हे सेलिब्रेशन करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे रद्द करण्यात आलं आहे. मागच्या वर्षी सुद्धा 'जलसा'वर होळीचं सेलिब्रेशन करण्यात आलं नव्हतं. मागच्या वर्षी करोना व्हायरसच्या संक्रमणामुळे अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबानं केवळ कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीतच होळी साजरी केली होती. अमिताभ बच्चन यांनी , जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या बच्चन, श्वेता बच्चन नंदा यांच्यासोबत एक अंतरंग उत्सवाचं आयोजन केलं होतं. ज्यात ऐश्वर्या आणि जया बच्चन यांनी सर्वांच्या कपाळावर टिका लावून एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अमिताभ बच्चन यांनी मागच्या वर्षी होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला होता. त्यांनी होळी सेलिब्रेशनचे काही ब्लॅक अँड व्हाइट थ्रोबॅक फोटो शेअर करत त्यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोंमध्ये राज कपूर, शम्मी कपूर, जीतेंद्र, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत अन्य बॉलिवूड सेलिब्रेटी होळी साजरी करताना दिसले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3d44p0w