मुंबई: सोशल मीडियावर सेलिब्रिटींना वाट्टेल तसं बोलणं, ट्रोलिंग करणं याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. त्यामुळं चिडलेले सेलिब्रिटी देखील अशांना चोख प्रत्युत्तर देऊ लागलेत. सोशल मीडियावर ट्रोलिंग करणारे खूप आहेत. मराठी कलाकारांना अनेकदा या ट्रोलर्सचे वाईट अनुभव येत असतात. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळे सेलिब्रिटी मंडळीही वैतागू लागली आहेत. याविरोधात स्टार मंडळी आवाज उठवू लागली आहेत. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हिनं नुकतीच या संदर्भात इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. तेजस्विनीनं शेअर केलेली या पोस्टला पाठिंबा देत अनेक सेलिब्रिटींनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'कृपया सोशल मीडियावर इतकं कठोर प्रकारे ट्रोल करणं थांबवा. तुम्हाला कल्पना नसते की, एखादा व्यक्ती कोणत्या अवस्थेत असतो, कोणत्या परिस्थितीशी झगडत असतो. कोणत्या मानसिक आजारांनी त्याला ग्रासलं आहे. तुमचे काही नकारात्मक शब्दांचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असं तेजस्विनीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सडेतोड उत्तरकाही दिवसांपूर्वी तेजस्विनीनं बोल्ड फोटो शेअर केले होते. तिच्या या फोटोंचं चाहत्यांनी कौतुकही केलं. परंतु अनेकांनी या फोटोवर तिला ट्रोल केलं. एका युजरनं तिच्या फोटोवर प्रतिक्रिया देताना लिहिलं होतं की, 'जेव्हा पुरस्कारांची वेळ येते तेव्हा सोबर फोटो टाकायचे आणि बाकीच्या वेळेस हे असे...' असं म्हणत त्याने तिला ट्रोल करायचा प्रयत्न केला. परंतु, यावर गप्प बसेल तर तेजस्विनी कसली. तिनंही त्याला प्रत्युत्तर देत चांगलंच सुनावलं. तिने लिहिलं, 'बाकी वेळेस असे म्हणजे कसे? आणि मी अभिनेत्री आहे....दोन्ही दिसू शकत नाही का? सोबर पण आणि तुमच्या भाषेतील ही अशी पण!!!' असं म्हणत तिनेंट्रोल करणाऱ्याला खडे बोल सुनावल होते. ट्रोलिंग का करतात?ट्रोल करणाऱ्याला फक्त तुमची मजा बघायची असते आणि इतरांचं लक्ष वेधून घ्यायचं असतं. एखाद्या गोष्टीवर वेगळं मत असणं आणि ट्रोल करणं यात फरक आहे. उदा. एखाद्याचा फॅशन सेन्स आवडला नाही तर त्याला तसं सांगणं वेगळं आणि त्यावरून नको त्या कमेंट्स करून त्या व्यक्तीचं खच्चीकरण करणं वेगळं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Pb3a7b