Full Width(True/False)

आमिरच्या मुलाचा लुक पाहून चाहत्यांना विश्वास बसेना, पाहा फरक

मुंबई- बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या '' या चित्रपटामध्ये तो वेगळ्या लुकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बाबांचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून मुलगाही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवताना दिसत आहे. आमिरचा मुलगा लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. त्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतलेली दिसून येतेय. आगामी चित्रपटासाठी जुनैदने स्वतःला पूर्णपणे बदललं आहे. त्याचे पूर्वीचे आणि आताचे फोटो पाहून चाहत्यांना विश्वास बसत नाहीए. सिद्धार्थ पी मल्होत्रा यांचा आगामी 'महाराजा' मध्ये जुनैद एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी जुनैदमध्ये झालेला हा बदल पाहून प्रेक्षक हैराण झाले आहेत. नुकतंच जुनैदला आमिर आणि बहीण इरासोबत मुंबईतील एका हॉटेलमधून बाहेर पडताना पाहण्यात आलं. सुरुवातीला पटकन जुनैदला ओळखता आलं नाही. तो गेल्या अनेक महिन्यांपासून स्वतःवर मेहनत घेत आहे. जुनैदने अनेक किलो वजन कमी केलं आहे. आता तो सडपातळ झाला असून त्याचे आताचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. दरम्यान, जुनैदने चेहऱ्यावरील मास्क काढून फोटोसाठी पोजदेखील दिली. जुनैद सध्या त्याचा आगामी 'महाराजा' चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. त्यासाठी लॉकडाउनमध्ये त्याने स्वतःला फिट बनवलं आहे. 'अर्जुन रेड्डी' सिनेमात झळकलेली अभिनेत्री शालिनी पांडे जुनैदसोबत भूमिका करणार आहे. हा चित्रपट महाराज लिबेल केस वर आधारित आहे. १८६२ साली एका धर्मगुरूने एका वृत्तपत्राविरोधात तक्रार दाखल केली होती. ज्यात महिला भक्तांचं शोषण केल्याचा प्रकार समोर आला होता. यात जुनैद पत्रकार करसनदासची भूमिका साकारत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30CI44o