मुंबई- गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या लॉकडाउनमुळे अनेकांना अतिशय कठीण परिस्थितीतून मार्ग काढावा लागला. तेव्हा सुरु झालेल्या करोनाच्या साथीमध्ये अनेकांचे जीव गेले. लॉकडाउनमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. कामानिमित्त मुंबईत आलेल्या कामगारांचे तर अतिशय वाईट हाल झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांकडे गावी परत जाण्यासाठीही पैसे नव्हते. अशाच भयानक परिस्थितीची शिकार ठरली ओडिसाच्या सर्वसामान्य घरातून आलेली मुलगी सुचिस्मिता. बॉलिवूडमध्ये नाव कमवायला आलेली लॉकडाउनमध्ये इथेच अडकून पडली. घरी जाण्यासाठी पैसे नसल्याने पुढे काय असा मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. सुचिस्मिता शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईत तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आली होती. २०१५ साली सुचिस्मिताने बॉलिवूडमध्ये सहाय्यक कॅमेरामन म्हणून काम सुरु केलं. हळुहळु ओळख मिळाल्यावर तिने , , आलिया भट्ट, अभिषेक बच्चन यांसारख्या बड्या कलाकारांसोबत कॅमेरामन म्हणून काम केलं. परंतु, २०२० साली आलेल्या करोनाच्या लाटेने सगळं उध्वस्त केलं. अचानक सुरु झालेल्या लॉकडाउनने जगायचं कसं असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. पैसे नसल्याने ती तिच्या गावी परत जाऊ शकत नव्हती. अखेरीस बॉलिवूड कलाकारांनी केलेल्या मदतीतील पैशातून तिने गावाकडची वाट धरली. सुचिस्मिताच्या वडिलांचं फार पूर्वीच निधन झालं. घरात तिची म्हातारी आई आणि ती अशा दोघीच असतात. यापूर्वी कामातून घरी पैसे पाठवता येत होते. परंतु, आता गावात आल्यावर काय करायचं हाही प्रश्न होताच. शेवटी तिने तिच्या घराजवळ मोमोज विकायला सुरुवात केली. दिवसभर तयारी करून ती संध्याकाळी मोमोज विकते. त्यातून ती तिचा आणि तिच्या आईचा उदरनिर्वाह करते. सध्या दिवसाला मिळणाऱ्या ३००-४०० रुपयात ती घरखर्च सांभाळते. लॉकडाउनमुळे डबिंग आर्टिस्ट, लेखक, कॅमेरामन आणि अनेक छोटे कलाकार यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. सुचिस्मिता त्यातील फक्त एक नाव आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ctZTsQ