Full Width(True/False)

जेव्हा शूटिंगमदरम्यान कोरिग्राफरनं रागात प्रियांका चोप्रावर फेकला होता माइक

मुंबई: बॉलिवूडची देसी गर्ल आता ग्लोबल स्टार झाली आहे. आता केवळ भारतातच नाही तर जगभरात तिचा चाहतावर्ग आहे. अर्थात आज प्रियांका ज्या ठिकाणी आहे तिथे पोहोचण्यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागला. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाचं पुस्तक '' प्रकाशित झालं. ज्यात तिनं तिच्या बालपणापासून ते तिच्या हॉलिवूड प्रवासाबाबत सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे. तिच्या बॉलिवूड करिअरमधील अनेक किस्से प्रियांकानं या पुस्तकात सांगितले आहेत. असाच एक किस्सा आहे जेव्हा एका डान्स कोरिओग्राफरनं शूटिंग सुरू असताना प्रियांकाला सर्वांसमोर सुनावलं होतं. बॉलिवूडमधील या घटनेची आठवण सांगताना हा माझ्यासोबत घडलेला सर्वात वाईट प्रसंग होता असं प्रियांका म्हणाली. हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा प्रियांका अक्षय कुमार आणि लारा दत्ता यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'अंदाज' चित्रपटात काम करत होती. एका डान्स सिक्वेन्समध्ये तिला सेटवरील इतरांसोबत स्टेप मॅच करता येत नव्हत्या. ज्यावर चित्रपटाचे डान्स कोरिओग्राफर राजू खान यांनी रागात आपल्या हातातील माइक प्रियांकाच्या दिशेने फेकला आणि तिच्यावर जोरात ओरडले होते. प्रियांकाला ओरडत ते म्हणाले, 'मिस वर्ल्ड आहेस तर असं नको समजू की तू डान्स करू शकतेस कोणतही काम करण्याआधी ते व्यवस्थित शिकून ये.' एका मुलाखतीत ही गोष्ट करिअरच्या सुरुवातील तिच्यासाठी सर्वांत मोठा धडा होती असं प्रियांकानं सांगितलं होतं. प्रियांका म्हणाली, 'यावरून मला, एक नवोदित आणि प्रोफेशनल व्यक्तीत काय फरक असतो हे समजलं. एखादी गोष्ट करत असताना त्याची पूर्ण तयारी करणं किती गरजेचं असतं हे त्यावेळी समजलं. त्यानंतर मी निर्णय घेतला की, यापुढे सेटवर जाण्याआधी मी पूर्ण तयारी करूनच जाईन.' प्रियांकानं सांगितलं, 'जेव्हा मी मिस वर्ल्ड झाले त्यावेळी मला लगेचच चित्रपटाच्या ऑफर्स मिळायला सुरुवात झाली होती. सुरुवातीला मी माझ्या आई-वडीलांशी बोलूनच निर्मय घेत असे. तेव्हा बाबांनी मला खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. ते म्हणले, तू तुझ्या आयुष्यात पुढे जाऊन 'मी त्यावेळी हे केलं असतं तर...' हा विचार कधी करावा असं मला वाटत नाही. तुला ही गोष्ट स्वतः करून पाहावी लागेल जर यात तुला अजिबात यश मिळालं नाही तर मग ते सर्व सोडून तू पुन्हा कॉलेजला जा आणि दुसरं काहीतरी कर. पण आता आलेली संधी अजिबात जाऊ देऊ नकोस.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eAsEFY