Full Width(True/False)

प्रसाद ओकच्या 'पिकासो'चा ट्रेलर रिलीज, अॅमेझॉन प्राईमचा पहिला मराठी सिनेमा

मुंबई ः कोकणातील दशावतार कलेची झलक दाखवत मद्यपी वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारीत असलेल्या '' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला अभिनेता मुख्य भूमिकेत आहे. चित्रपट येत्या शुक्रवारी, १९ मार्च २०२१ रोजी अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. व्हिडिओचा हा पहिला मराठी चित्रपट आहे. कोकणामधील दुर्गम गावातील एक तरूण विद्यार्थी, पांडुरंग याची गंधर्व राष्‍ट्रीय पातळीवरील पिकासो आर्टस् स्‍कॉलरशिपसाठी निवड होते. पांडुरंगमधील ही कला अधिक बहरावी आणि त्याचा प्रसार होण्याच्या हेतूने पिकासोचे मूळ असलेल्या स्‍पेनला जाण्याची संधी मिळते. या स्‍पर्धेसाठी प्रवेश फी बद्दल तो आईवडिलांना सांगतो. परंतु आपल्याला ते परवडणार नाही असे सांगत ते नकार देतात. या परिस्थितीवर पांडुरंग कशी मात करतो? पांडुरंग आणि त्याच्या मुलाच्या कलेला वाव मिळेल का यावर या चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे. प्‍लॅटून वन फिल्‍म्‍स अॅण्‍ड एव्‍हरेस्‍ट एंटरटेन्‍मेंटच्‍या बॅनरअंतर्गत शिलादित्‍य बोराद्वारे निर्मित 'पिकासो'चे दिग्‍दर्शन व लेखन अभिजीत मोहन वारंग, सहलेखन तुषार परांजपे यांनी केले आहे. या चित्रपटात प्रसाद ओक यांच्यास समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकादम प्रमुख भूमिकेत आहेत. भारत आणि २४० देशांमधील प्राईम सदस्‍यांना हा 'पिकासो'चा विशेष वर्ल्‍ड प्रिमिअर पाहता येणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्‍दर्शक व सह-लेखक अभिजीत मोहन वारंग म्‍हणाले, ''मला बालपणापासूनच दशावतार कलेचे आकर्षण होतेच. या चित्रपटात वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच लोककथेनुसार लोककलेचा उगम तळकोकणाच्‍या वालावल शहरामधील लक्ष्‍मी-नारायण मंदिरामधून झाला आहे, तिथे आम्‍ही चित्रपटाचे शूटिंग केले. या चित्रपटासोबतच आम्ही कलाकाराच्‍या जीवनातील दैनंदिन आव्‍हानांना लोकांसमोर आणण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. ''पिकासो' हा चित्रपट सर्व वयोगटांतील व सीमांपलीकडील प्रेक्षकांना प्रेरणा देईल, असे मत प्‍लॅटून वन फिल्‍म्‍सचे निर्माता शिलादित्‍य बोरा यांनी व्यक्त केले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eESyIB