मुंबई- बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कृती सेनॉन लवकरच दिग्दर्शक ओम राऊत यांच्या '' या बिग बजेट चित्रपटात झळकणार आहे. तिने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने अनेकांची मन जिंकली आहेत. कृती त्या अभिनेत्रींपैकी आहे ज्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये त्यांचं स्थान निर्माण केलं. 'हिरोपंती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी कृती नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. कृती सध्या 'आदिपुरुष' चित्रपटाचं चित्रीकरण करत असून तिने तिच्या सहकलाकाराबद्दलची काही गुपितं चाहत्यांसोबत शेअर केली आहेत. कृतीने एका मुलाखतीत चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता बद्दल माहिती दिली. तिने त्याच्याबद्दल अनेक न ऐकलेल्या गोष्टी प्रेक्षकांना सांगितल्या. तिने म्हटलं, 'पहिल्यांदा जेव्हा मी प्रभासला पाहिलं तेव्हा तो अत्यंत शांत आणि लाजाळू अभिनेता वाटला. परंतु, जेव्हा आमच्यात बोलणं सुरु झालं तेव्हा प्रभास थांबायचं नाव घेत नव्हता. त्याला बोलायला प्रचंड आवडतं. त्याला नेहमी भरपूर गप्पा मारायच्या असतात. इतकंच नाही तर तो खूप खादाड आहे. त्याला सारखं काही ना काही खायला लागतं. याबाबतीत आम्ही दोघे एकसारखे आहोत. मलाही खायची खूप आवड आहे. त्याला फक्त खायलाच नाही आवडत तर तो सेटवरील सगळ्यांना देखील खायला घालत असतो. आम्हा दोघांची विचार करण्याची पद्दत बऱ्यापैकी एकसारखी आहे. आम्ही 'आदिपुरुष' च्या सेटवर खूप मस्ती करत असतो.' 'आदिपुरुष' या चित्रपटात कृतीसोबत प्रभास आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी सीतेची भूमिका अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला देण्यात आली होती. परंतु, काही कारणांमुळे दीपिकाने ही भूमिका करण्यास नकार दिला. त्यानंतर या भूमिकेसाठी कुतीला विचारणा करण्यात आली. या भूमिकेची लोकप्रियता खूप जास्त असल्याने हे पात्र साकारताना मनावर दबाव असल्याचं तिने सांगितलं. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासाठी ती मेहनत करत आहे, असं तिने म्हटलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39bfueU