Full Width(True/False)

संग्राम समेळच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीनं शेअर केला बोल्ड फोटो

मुंबई: मराठी सिनेसष्टीतील अभिनेता सध्या चर्चेत आहे. तो चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्याचं दुसलं लग्न. संग्रामच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. पहिली पत्नी अभिनेत्री हिच्यासोबतच्या नात्यात काही तरी बिनसलं असल्याचं कुठंही चर्चा झाली नव्हती. आता संग्रामच्या दुसऱ्यालग्नानंतर पल्लवीनं सोशस मीडियावर बोल्ड फोटो शेअर केल्यानं ती चर्चेत आली आहे. दोघांच्या नात्यात दुरावा का आला? याचं कारण अद्यापही समोर आलं नाहीए. संग्राम आणि पल्लवी दोघांनीही यावर अद्यापही प्रतिक्रिया दिली नाहीए. पल्लवीनं स्वीमसूटमधील फोटो शेअर केलाय. त्यात तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. इतकंच नाही तर महिला दिनानिमित्त पल्लवीनं शेअर केलेली पोस्टही खूप काही सांगून जात आहे. 'हवं तसं जगायला आवडतं मला, लोक काय बोलतील याचा विचार करण्यासाठी मी जन्म घेतला नाहीये, असं म्हणण्याची आणि ती आमलात आणण्याची हिम्मत, शक्ती प्रत्येक स्त्रीला मिळो', असं पल्लवीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. हिच्याशी संग्रामनं लग्नगाठ बांधली हिच्याशी संग्रामनं दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली . करोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत संग्राम आणि श्रद्धाचा विवाहसोहा इचलकरंजी इथं पार पडला. संग्रामच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो 'पुढचं पाऊल' या मालिकेतून घराघरांत पोहोचला. मालिकेतली 'समीर' या व्यक्तीरेखेनं त्याला ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्याने 'एकच प्याला' , 'कुसुम मनोहर लेले'या नाटकांत काम केलं. तसंच ललित 205, हे मन बावरे, या मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विकी वेलिंगकर, स्वीटी सातारकर, ब्रेव हार्ट (जिद्द जगण्याची) या चित्रपटांतही त्यानं काम केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rTKOpQ