Full Width(True/False)

सोनाली कुलकर्णीचा 'हाकामारी' येतोय, अभिनेत्रीने घेतला धाडसी निर्णय

मुंबई- अभिनयाच्या क्षेत्रात कलाकार म्हणून काम करत असताना कधी तरी आपण एखाद्या चित्रपटाचे दिग्दर्शन अथवा निर्मिती करावी, असं स्वप्न अनेकांचं असतं. प्रसाद ओक, सुबोध भावे यांच्या पाठोपाठ नटरंग, क्लासमेट, मितवा, हिरकणी अशा सिनेमांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली अभिनेत्री ही देखील निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. सोनाली कुलकर्णी आणि प्लॅनेट मराठी यांची निर्मिती असलेल्या '’ या सस्पेन्स सिनेमाची घोषणा केली आहे. प्रेक्षक सस्पेन्स सिनेमे बघायला नेहमीच उत्सुक असतात, कारण अशा सिनेमांमधून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. मनोरंजन विश्वात अनेक सिनेमे हे सत्यघटनांवर आधारित आहेत. असाच एक सस्पेन्स सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव आहे 'हाकामारी.' प्लॅनेट मराठीचे सीएमडी आणि या सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हे मिळून ही कलाकृती साकारणार आहेत. 'हाकामारी' हा प्लॅनेट मराठीचा पहिलाच वेब चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन फिल्मफेअर पुरस्कार विजेते दिग्दर्शक करणार आहेत. या सिनेमाचे 'हाकामारी’ हे नाव अतिशय वेगळे आणि उत्सुकता निर्माण करणारे असल्याने त्याचे कथानक नेमके कसे असेल, याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. 'हाकामारी’ या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे, याबद्दल उत्सुकता आहे. दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी याआधी धुराळा, आनंदी गोपाळ, डबलसीट, वायझेड, मला काहीच प्रॉब्लेम नाही आदी यशस्वी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. यातील अनेक चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर वाहवा मिळवली आहे. 'हाकामारी’ या सिनेमाद्वारे ते पहिल्यांदाच एका सस्पेन्स पद्धतीच्या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाची कथा 'दिल दिमाग और बत्ती' फेम आणि साहित्य परिषदेचे पुरस्कार प्राप्त लेखक ऋषिकेश गुप्ते यांनी लिहिली असून त्यांनी आतापर्यंत दंशकाल, दैत्यालय, अंधारवारी, कलजुगरी या त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या असून त्या गाजल्या आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cz1c8Z