Full Width(True/False)

मराठी मालिकांची सोशल मीडियावर चर्चा; हे भन्नाट मीम्स एकदा पाहाच!

मुंबई: टीव्ही मालिकांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या घटनांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरू असते. अनेकदा प्रेक्षक पसंती दर्शवतात तर नाराजी देखील व्यक्त करताना दिसतात. अशातच सोशल मीडियावर मराठी मालिकांचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं दिसून येत आहे. सासूसुनेचा तोच तोच ड्रामा, रिअॅलिटी शोजचं पेव आणि 'सीरिअस सोशल इश्यूज'नंतर टीव्ही चॅनल्सनी आपला मोर्चा दैनंदिन विषयांकडे वळवला आहे. आजूबाजूच्या वास्तव आयुष्यात घडणाऱ्या अशा विषयांच्या काही नवीन मालिका नुकत्याच सुरू झाल्या आहेत. तर काही सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचं चित्रण मालिकांमधून पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकही अशा मालिकांबरोबर स्वत:ला रिलेट करताना दिसतात. परंतु काही गोष्टी या न पटणाऱ्या असतात, यावर प्रेक्षक लगेचच व्यक्त होताना दिसत आहेत. येऊ कशी तशी मी नांदायला'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेच्या नुकत्याच प्रसारीत झालेल्या एका भागात स्वीटू लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसते. ती अंबरनाथला जात असते, असं दाखवण्यात आलं. ती इतकी गाढ झोपते की, तिला गाडी कारशेडमध्ये गेल्याचंही लक्षात येत नाही. या प्रसंगावरून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रचंड मीम्स व्हायरल केले आहेत. देवमाणूस देवमाणूस मालिकेचीही सोशल मीडियावर चर्चा असते. मालिकेतील पात्रं आणि त्यांचे संवाद यांचे मीम्स व्हायरल झाले आहेत. अग्गंबाई सुनबाई नव्यानं सुरू झालेली अग्गंबाई सुनबाई या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या मालिकेेचे मीम्सही सोशल मीडियावर पाहायला मिळतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bZcjsC