Full Width(True/False)

'गंगूबाई काठियावाडी' अडचणीत; गंगूबाईंच्या दत्तक पुत्राचे मोठे आरोप

मुंबई: बॉलिवूड दिग्दर्शक यांच्या '' चित्रपटाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सातत्यानं या चित्रपटाला विरोध होत असतानाच आता अभिनेत्री , दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि चित्रपटाचे लेखक यांना माझगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईच्या मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी या सर्वांना २१ मे दिवशी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या विरोधात महाराष्ट्र विधानसभेत सुद्धा चर्चा झाली होती. काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी या चित्रपटाच्या नावाला आपला विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता दंडाधिकाऱ्यांनी हे आदेश मानहानी खटल्याच्या अंतर्गत या चित्रपटाशी संबंधित व्यक्तींना पाठवले आहेत. बाबू रावजी शाह नावाच्या एका व्यक्तीने हा मानहानीचा खटला दाखल केला होता. आपण गंगूबाई यांचे दत्तक पुत्र आहोत असा दावा या व्यक्तीनं केला आहे. तसेच या चित्रपटामुळे आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी होत असल्याचं या व्यक्तीनं म्हटलं आहे. बाबू रावजी शाह यांचं म्हणणं आहे की, हुसैन झैदी यांचं पुस्तक 'माफिया क्‍वीन्‍स ऑफ मुंबई'मध्ये लिहिल्या गेलेल्या अनेक गोष्टी चुकीच्या आहेत. अशात संजय लीला भन्साळी अशा खोट्या तथ्यांवर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहेत. म्हणून त्या दिग्दर्शकांसोबतच या पुस्तकाच्या लेखकांच्या विरोधातही मानहानीचा खटला दाखल केला आहे. या आधी बाबू रावजी शाह यांनी सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. या ठिकाणी त्यांनी चित्रपटाचा प्रोमो आणि ट्रेलरवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र त्यांची मागणी न्यायालयानं नाकारली. २०११ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकावर २०२०मध्ये खटला दाखल केला जात असल्याचं कारण देत न्यायालयानं बाबू रावजी यांची मागणी नाकारली. या सगळ्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे, बाबू रावजी शाह यांना ते गंगूबाई यांचे दत्तक पुत्र आहेत याचा कोणता पुरावा न्यायालयात सादर करता आला नाही. दरम्यान चित्रपटाचे निर्माते आणि लेखक यांनी गंगूबाई यांच्या कुटुंबासोबत शाह यांना कधीच न पाहिल्याचं न्यालयात सांगितलं. सत्र न्यायालयातील खटला हारल्यानंतर बाबू रावजी यांनी चित्रपटाचे निर्माते आणि लेखक यांच्या विरोधात फौजदारी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rkpKb5