Full Width(True/False)

निष्काळजीपणाचा कळस!करोना पॉझिटिव्ह असताना गौहर खान बिनधास्त फिरली

मुंबई: राज्यात रुग्णांची संख्या वाढत असलतानाच अनेक सेलिब्रिटींना देखील करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. असं असलं तरी अनेक सेलिब्रिटी करोनाच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करताना दिसतायत.कोविड बाधित असूनही सार्वजनिक परिसरात वावरणाऱ्या सिनेअभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेत्रीवर करोना विषयक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौहरला करोनाची बाधा झालेली असतानाही ती सार्वजनिक परिसरांमध्ये वावरली, एवढंच नव्हे तर तिनं चित्रीकरणांमध्येही भाग घेतला. परिणामी कोविड संसर्ग इतर व्यक्तींना होऊ शकेल, अशा प्रकारची कृती केल्यामुळे आणि कोविड विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच तिला महापालिकेच्या विलगीकरण केंद्रामध्ये दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'के पश्चिम' विभागाच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांद्वारे सदर बाबत पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, २६९, २७० आणि साथरोग नियंत्रण कायद्याच्या कलम २ व ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्रीवर करोना विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी करोना विषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची महापालिका प्रशासनाची भूमिका आहे. तरी व्यापक हिताच्यादृष्टीने कोविड विषयक नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे पुन्हा एकदा करण्यात येत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cwJ27F