Full Width(True/False)

Realme 8 सीरीज भारतात २४ मार्चला लाँच होणार, प्रोमो व्हिडिओ आला समोर

नवी दिल्लीः Realme 8 भारतात २४ मार्च रोजी लाँच करण्यात येणार आहे. कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी प्रोमो व्हिडिओ द्वारे टीज केले आहे. रियलमी ८ सीरीज गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कंपनीने थेट नाही पण अप्रत्यक्षरीत्या या फोनच्या लाँचिंगची तारखेचा खुलासा केला आहे. याशिवाय, सीईओने २४ मार्चला लाँच होणाऱ्या प्रोडक्टमध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा फीचर दिला आहे. याआधी रियलमी ८ सीरीज वरून सांगितले होते की, या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. वाचाः Realme India च्या यूट्यूब चॅनेलवर एक प्रोमो व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहे. खाली इम्बेड पाहू शकता. या व्हिडिओत माधव सेठ यांना बुद्ध इंटरनॅशनल सर्किट वर रेसिंग करताना पाहू शकता. या व्हिडिओत खुलासा करण्यात आला आहे की, कंपनी नवीन प्रोडक्ट २४ मार्चला लाँच केले जाणार आहे. परंतु, कंपनीने हे स्पष्ट केले नाही की, २४ मार्चला लाँच केले जाणारे प्रोडक्ट कोणते असणार आहे. व्हिडिओच्या शेवटी माधव शेट प्रेक्षकांना म्हणतात की, तुम्ही इनफिनिटीला कॅप्चर करण्याचे धाडस दाखवले आहे का? जर, नाही तर Realme तुम्हाला १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासोबत इनफिनिटी कॅप्चर करण्याचे चॅलेंज देते. याशिवाय, व्हिडिओत रेसिंग कारला ८ बनवले गेले आहे. Realme 8 सीरीजला २४ मार्च रोजी लाँच करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. रियलमी ८ सीरीजसाठी १०८ मेगापिक्सलचे कॅमेराला टीज केले हे पहिल्यांदा नाही. याआधी गेल्या महिन्यात माधव सेठ यांनी एक ट्विट पोस्ट केले होते. ज्यावरून हे संकेत मिळाले होते की, आगामी रियलमी ८ सीरीज मध्ये १०८ मेगापिक्सलचा सेन्सर दिला जाऊ शकतो. परंतु, हे स्पष्ट नव्हते की, ते कोणत्या मॉडलमध्ये मिळेल. यानंतर Realme 8 वरून कंपनीने स्पष्ट केले होते की, हा ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा फोन दिला जाणार आहे. म्हणजेच Realme 8 Pro मध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. वाचाः प्रो व्हेरियंट यूएस एफसीसी लिस्ट झाला होता. यावरून संकेत मिळत होते की, रियलमी ८ प्रो मध्ये 4,500 एमएएचची बॅटरी सोबत ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. हा फोन अँड्रॉयड ११ आधारित असणार आहे. जो रियलमी यूआय २.० वर काम करणार आहे. प्रो मॉडलमध्ये ६.४ इंच सुपर अमोलेड डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो जी ९५ प्रोसेसर आणि 5,000 एमएएचची बॅटरी दिली जाणार आहे. सोबत ३० वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3txnZZN