Full Width(True/False)

टेलिग्राम युजर्संसाठी आले नवीन फीचर्स, पाहा काय होणार फायदा

मुंबईः ‘व्हॉट्सअॅप’च्या गोंधळानंतर टेलिग्रामकडे वळणाऱ्या यूजरची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे आता टेलिग्रामनेही नवी फीचर्स सादर केली आहेत. त्यामध्ये ऑटो डिलीट मेसेज, होम विजेट्स आणि ग्रुपमध्ये अमर्यादित सदस्यांचा समावेश आदींचा समावेश आहे. वाचाः ही सर्व फीचर्स प्राप्त करण्यासाठी यूजरना अॅप अपडेट करावे लागणार आहे. ऑटो डिलीट फीचरच्या मदतीने कोणत्याही वेळी एका ग्रुपमधील संभाषण पूर्णपणे नष्ट करता येणार आहे. मेसेज पाठविण्यापूर्वी यूजर ग्रुपवर २४ तास किंवा सात दिवसांचा टायमरही लावू शकणार आहेत. या फीचरचा उपयोग करण्यासाठी अँड्रॉइड यूजरना चॅटच्या वरच्या बाजूचा क्लिअर हिस्ट्री ऑप्शनचा वापर करून वेळही निवडावी लागणार आहे. वाचाः टेलिग्रामच्या एका ग्रुपमध्ये आता दोन लाख सदस्यांचा अंतर्भाव करता येणार आहे. त्यामुळे आता सदस्यांना मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि स्टीकर शेअर करता येणार आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3q8NhuQ