Full Width(True/False)

२०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ३ स्वस्त प्लान, फ्री कॉलसोबत डेटा

नवी दिल्लीः रिलायंस जियो (Reliance Jio) कडे २४ दिवसांपासून २६५ दिवसांपर्यंतची वैधता असलेले रिचार्ज प्लान आहे. ज्यात रोज ३ जीबी पर्यंत डेटा दिला जातो. असे प्लान खूप कमी आहेत. ज्यात रोज जास्त डेटाची गरज असते. काही रिचार्ज प्लान मध्ये वैधता आणि ओटीटी सब्सक्रिप्शनवर फोकस केले जाते. जिओच्या काही प्लान खूप स्वस्त किंमतीचे आहेत. जर तुम्हाला डेटाची गरज मर्यादीत असेल तर तुमच्यासाठी हे प्लान परफेक्ट आहेत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लान संबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः जिओचा १२९ रुपयांचा प्लान हा रिलायन्सचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान आहे. १२९ रुपयांचा रिचार्ज प्लान आहे. यात युजर्संना २८ दिवसांची वैधता मिळते. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंगचा फायदा मिळतो. जिओच्या या प्लानमध्ये २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, ३०० एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली जाते. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. वाचाः जिओचा १४९ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओचा १४९ रुपयांचा रिचार्ज प्लान आहे. युजर्संना २४ दिवसांची वैधता मिळते. प्लानमध्ये कोणत्याही नेवटर्कवर नंबरवर फ्री कॉलिंगचा फायदा युजर्संना मिळतो. जिओच्या या प्लानमध्ये युजर्संना रोज १०० जीबी डेटा मिळू शकतो. युजर्संना एकूण २४ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली जाते. याशिवाय, जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः जिओचे १९९ रुपयांचे प्लान २०० रुयपांचा रिलायन्स जिओकडे १९९ रुपयांचा रिचार्ज प्लान आहे. रिलायन्स जिओच्या १९९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. जिओच्या या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच प्लानमध्ये एकूण ४२ जीबी डेटा दिला जातो. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली जाते. जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fgO0Zc