Full Width(True/False)

'शोले'मधील एक सीन शूट करण्यासाठी २७ वेळा मुंबईतून बंगळूरूला गेले होते 'सांभा'

मुंबई: '' चित्रपटाचं नाव बॉलिवूड चित्रपटाच्या इतिहात आवर्जुन घेतलं जाईल. या चित्रपटानं प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप सोडली होती. खास करून या चित्रपटातील डायलॉग प्रेक्षकांमध्ये कमालीचे लोकप्रिय ठरले होते आणि आजही हे डायलॉग प्रेक्षकांचे तोंडपाठ आहेत. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, अमजद खान अशी तगडी स्टार कास्ट असलेल्या या चित्रपटात सांभाची भूमिका साकारणारे सहाय्यक कलाकार सुद्धा प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. पण मॅक मोहन यांनी या चित्रपटातील एक डायलॉगसाठी तब्बल २७ वेळा मुंबई ते बंगळुरू असा प्रवास केला होता. 'डॉन', 'कर्ज', 'सत्ते पे सत्ता', 'जंजीर', 'रफूचक्कर', 'शान', 'खून पसीना' या सारख्या चित्रपटात अभिनेता मॅक मोहन यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. पण प्रेक्षक त्यांना ओळखतात ते शोमधील त्यांनी साकारलेल्या सांभामुळे. या चित्रपटात मॅक मोहन यांचा केवळ एकच डायलॉग होता तो म्हणजे 'पूरे पचास हजार...' केवळ या एका डायलॉगनं त्यांना एवढं प्रसिद्ध केलं की, लोक त्यांनी या नावानेच ओळखू लागले होते. जेव्हा गब्बर विचारतो, 'अरे सांभा सरकारने मला पकडण्यासाठी किती रुपयांचं बक्षिस ठेवलं आहे.' त्यावर सांभा सांगतो, 'पूरे पचास हजार...' संपूर्ण चित्रपटात ती शब्दांच्या या एका डायलॉगच्या शूटिंगसाठी अभिनेता मॅकमोहन यांनी तब्बल २७ वेळा मुंबई ते बंगळुरू असा प्रवास केला होता. खरं तर या चित्रपटाच्या सुरुवातीला त्यांची भूमिका थोडी मोठी होती. मात्र जेव्हा चित्रपट एडिट करण्यात आला त्यावेळी त्यात मॅक मोहन यांचा तीन शब्दांचा डायलॉग तेवढा उरला होता. एका मुलाखतीत याबद्दल बोलताना मॅक मोहन म्हणाले होते, 'जेव्हा मी शोले पाहिला त्यावेळी मला रडू आलं होतं. चित्रपट पाहिल्यावर मी लगेचच दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं माझा एवढासा सीन का ठेवला. हा पण काढून टाकायला हवा होता. त्यावर ते म्हणाले जर चित्रपट हिट झाला तर हाच सीन तुला प्रसिद्धी मिळवून देईल आणि लोक तुला सांभा नावने ओळखतील आणि पुढे हेच झालं. चित्रपट हिट झाला आणि माझा डायलॉग सुद्धा' मॅक मोहन यांनी 'हकीकत' या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात १९६४ मध्ये केली होती. त्यांनी आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत २०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत शोले व्यतिरिक्त 'डॉन', 'कर्ज', 'रफूचक्कर', 'खून पसीना' या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी जवळपास ४६ वर्ष बॉलिवूडमध्ये काम केलं. सर्व चित्रपटात त्यांच्या खलनायकी भूमिकांनी प्रेक्षकांना आकर्षित केलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lPZ1SL