Full Width(True/False)

BSNL चा स्वस्त प्रीपेड प्लान, १८० दिवस दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः भारतीय संचार निगम लिमिटेड () च्या ग्राहकांसाठी एक गुड न्यूज आहे. कमी किंमतीत जास्त वैधता असलेले प्लान कंपनी ऑफर करते. बीएसएनएलच्या तुलनेत Airtel, Jio आणि Vi सारखी कंपनी केवळ ३६५ नंतर ८४ दिवसांची वैधता देणारे प्लान ऑफर करते. तर काही कंपन्या १८० दिवसांची वैधता असलेले प्लानची किंमत १ हजार रुपयांहून जास्त आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी बीएसएनएलचा एक अशा प्लानची माहिती देत आहोत. ज्यात १८० दिवसांची म्हणजेच ६ महिन्यांपर्यंत वैधतेसोबत येतो. याची किंमत १ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. बीएसएनएलचा हा प्लान तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. वाचाः BSNL च्या या प्रीपेड रिचार्ज प्लानची किंमत ९९७ रुपये आहे. याची वैधता १८० दिवसांची आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात रोज ३ जीबी डेटा मिळतो. ३ जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 80 kbps होते. याशिवाय, रिचार्ज प्लान अंतर्गत युजर्स प्रत्येक नेटवर्कवर फ्री व्हाइस कॉलिंग करू शकतील. यात रोमिंग सुविधा उपलब्ध होणार आहे. यात जास्तीत जास्त २५० मिनिट फ्री कॉलिंग मिळू शकते. वाचाः अन्य बेनिफिट्समध्ये ९९७ रुपयांच्या या प्लानमध्ये युजर्संना रोज १०० एसएमएस फ्री मिळते. युजर्संना या प्लानमध्ये ६० दिवसांपर्यंत PRBT आणि लोकधुन कॉन्टेंटची सुविधा उपलब्ध होणार आहे. या व्यतिरिक्त अन्य टेलिकॉम कंपन्यामध्ये Airtel कंपनी १८० दिवसांपर्यंत रिचार्ज प्लान नाही. तर जिओ १८० दिवसांच्या प्लानची किंमत १२०६ रुपये आहे. परंतु, हा डेटा वाउचर आहे. Vi च्या १८० दिवसांच्या प्लानची किंमत ११९७ रुपये आहे. ज्यात रोज केवळ १.४ जीबी डेटा दिला जातो. बीएसएनएलचा ९९७ रुपयांचा प्लान बाकीच्या टेलिकॉम कंपन्याच्या रिचार्ज प्लानच्या तुलनेत बेस्ट प्लान आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30Pn6zo