Full Width(True/False)

POCO X3 Pro लाँच आधीच ई-कॉमर्स साइटवर लिस्ट, किंमत आणि कलर लीक

नवी दिल्लीः पोको भारतात ३० मार्च रोजी आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. नवीन फोन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या POCO X3 चे अपग्रेडड व्हर्जन असणार आहे. DealnTech ने पोको एक्स3 प्रो ला लाँच करण्याआधी एक यूरोपियन रिटेलर वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहे. लिस्टिंगवरून खुलासा करण्यात आला आहे की, फोनला दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात येणार आहे. याशिवाय, पोको एक्स ३ प्रोची कलर आणि किंमत सुद्धा उघड झाली आहे. वाचाः POCO X3 Pro ला ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज मध्ये लाँच करण्यात येऊ शकते. या व्हेरियंट्सची किंमत २६९ यूरो (जवळपास २३ हजार ३००) रुपये आणि ३१९ यूरो ( २७ हजार ६०० रुपये) असू शकते. फोनला फँटम ब्लॅक, फ्रॉस्ट ब्लू आणि मेटल ब्राँज कलर मध्ये लाँच केले जाण्याची शक्यता आहे. वाचाः POCO X3 Pro फोनला १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटच्या फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोनमध्ये अमोलेड किंवा एलसीडी स्क्रीन दिली जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. अनेक लीक मध्ये हा दावा करण्यात आला आहे की, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६० प्रोसेसर दिला जाणार आहे. कंपनीने चिपसेटवरून कोणतीही माहिती शेयर केलेली नाही. वाचाः POCO X3 Pro मध्ये 5200mAh बॅटरी मिळू शकते. या फोनमध्ये ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेराचा क्वॉड रियर कॅमेरा रियर सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये 4G VoLTE, ड्यूल-बँड वाय-फाय, एनएफसी आणि अँड्रॉयड 11 ओएस सारखे फीचर्स असू शकतात. फोन संबंधी अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. वाचाः पोको २२ मार्चला एक ग्लोबल इव्हेंटचे आयोजन करीत आहे. या इव्हेंटमध्ये लाँच करण्यात येत असलेल्या फोनची माहिती उघड करण्यात आली नाही. परंतु, लीक झालेल्या बातम्यानुसार, Poco F3 वरून पडदा उठू शकतो. हा फोन चीनमध्ये लाँच झालेल्या रेडमी के ४० चे रिब्रँडेड व्हर्जन असणार आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bSRNKm