नवी दिल्लीः शाओमीने आपली स्मार्ट टीव्हीचा पोर्टफोलियोला भारतात वाढवण्यासाठी आपली पहिले लाँच केली आहे. स्मार्ट टीव्हीला तीन स्क्रीन साइज मध्ये लाँच केले आहे. यात ५० इंच, ५५ इंच आणि ६५ इंच स्मार्ट टीव्हीचा समावेश आहे. या तिन्ही व्हेरियंटला रेडमी टीव्ही एक्स सीरीज अंतर्गत लाँच करण्यात आले आहे. टीव्हीला एका ऑनलाइन इव्हेंटच्या मदतीने लाँच करण्यात आले आहे. हे डॉल्बी व्हिजन, डॉल्बी एटमॉस आणि HDR 10+ सपोर्ट आणि 30W च्या स्पीकर्स सोबत येते. शाओमी आतापर्यंत टीव्हीला मी सीरीज अंतर्गत लाँच करीत होते. परंतु, आता कंपनीने यात बदल करीत टीव्हीला रेडमी लाइन अप अंतर्गत लाँच केले आहे. वाचाः Redmi TV X50, X55, X65 ची किंमत रेडमी टीव्ही X50 ची किंमत ३२ हजार ९९९ रुपये आहे. X55 ची किंमत ३८ हजार ९९९ रुपये आहे. तर X65 ची किंमत ५७ हजार ९९९ रुपये आहे. या तिन्ही टीव्हीला सेल २६ मार्च पासून सुरू होणार आहे. दुपारी १२ वाजेपासून Mi.com, अॅमेजॉन इंडिया, मी स्टोर्सवर सेल सुरू होणार आहे. ग्राहकांना ICICI बँक क्रेडिट कार्डवर २ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. वाचाः रेडमी टीव्ही X सीरीज 4K व्हिडिओला सपोर्ट करतो. तर तुम्हाला यात 3840×2160 रेजॉल्यूशन मिळतो. स्मार्ट टीव्हीत शाओमीचे विविड पिक्चर इंजिन आणि HDR10+ चा सपोर्ट दिला आहे. हे डॉल्बी व्हिजन आणि MEMC सोबत येते. टीव्हीत 64 बिट क्वाड कोर प्रोसेसर आणि 2 जीबी रॅम आणि 16 जीबी चे इंटरनल स्टोरेज दिले आहे. वाचाः ऑडियोत यात तुम्हाला 30W चे स्पीकर्स मिळतात. जे डॉल्बी ऑडियोला सपोर्ट करतात. कनेक्टिविटीसाठी यात HDMI 2.1 पोर्ट्स, दोन यूएसबी पोर्ट्स, 3.5mm चे हेडफोन जॅक आणि ब्लूटूथ 5.0 मिळते. तर याचा एक HDMI पोर्ट eARC सपोर्ट करतो. तसेच गूगल असिस्टेंटचा सपोर्ट करतो. रेडमीचा टीव्ही कंट्रोल ठीक मी बॉक्स ४के रिमोट कंट्रोल प्रमाणे आहे. यात नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओ साठी डेडिकेटेड हॉटकीज मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38RUHwZ