मुंबई- बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्माते असलेले राम गोपाल वर्मा हे त्यांच्या सडेतोड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. ते नेहमीच चित्रपटांमुळे किंवा त्यांच्या ट्वीटमुळे चर्चेत असतात. कोणालाही न घाबरता आपलं मत मांडणं आणि त्यावर ठाम राहणं यासाठी ते ओळखले जातात. सध्या ते गोव्यातून आपलं संपूर्ण काम पाहत असून लवकरच त्यांचा 'डी कंपनी' सिनेमा प्रदर्शित होत आहे. सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये ते व्यग्र आहेत. नवभारत टाइम्सला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी आणि यांच्या बायोपिकवर आपली मतं मांडली. या मुलाखतीदरम्यान कंगनाबद्दल विचारणा करण्यात आली असता त्यांनी म्हटलं, 'जी व्यक्ती कोणालाही घाबरत नाही, त्यांचे स्वतःचे विचार आणि दुसऱ्यांना दाखवण्याचे विचार नेहमी वेगवेगळे असतात. अशा व्यक्ती काहींना आवडतात तर काहींना आवडत नाहीत. मीदेखील तिच्या काही ट्वीटना पाठिंबा देतो. परंतु, तिचे सगळेच ट्वीट मला पटतात असं नाही. माझं तिच्याशी वैयक्तिक स्तरावर कोणतंही वैर नाही.' कंगनासोबत चित्रपट बनविण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, 'मला नाही वाटत मी कंगनासोबत कधी कोणताही चित्रपट करेन. ती एक प्रतिभावंत कलाकार आहे. चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका ती खऱ्या आयुष्यातदेखील जगते. ती एक माणूस म्हणून चांगली व्यक्ती आहे. सध्या तरी मी तिच्यासोबत कोणताही चित्रपट बनवण्याच्या विचारात नाही.' '’ मधील जयललिता यांच्या भूमिकेत कंगना त्यांना कशी वाटली या प्रश्नावर त्यांनी बिनधास्तपणे उत्तर देत म्हटलं, 'मी 'थलाइवी’ बद्दल खात्रीने सांगू शकत नाही. दक्षिणेत जयललिता यांची जी प्रतिमा आहे त्यात कंगनाला पाहणं मला पसंत नाही. जर मला निवड करण्याची संधी मिळाली तर मला कंगनाला 'मणिकर्णिका' सारख्या भूमिकेत पाहायला जास्त आवडेल. पण ती जयललिता यांच्या भूमिकेत बसत नाही.' राम यांच्या मते चाहत्यांना ज्या भूमिकांमध्ये कंगनाला पाहायला आवडेल त्याच भूमिका तिने केल्या पाहिजेत. जयललिता यांच्या बायोपिकसाठी एखाद्या ५० वर्षाच्या अभिनेत्रीची निवड करायला हवी होती. ती या भूमिकेला पूर्ण न्याय देऊ शकली असती. फक्त चित्रपटासाठी कंगनाने स्वतःच्या शरीरात प्रचंड बदल करणं त्यांना पटलं नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3trBlqc