नवी दिल्लीः रिलायंस जियो (Reliance Jio) ४ प्रीपेड प्लान्सची सर्वात जास्त डिमांड आहे. कंपनीने याला बेस्ट सेलर नाव दिले आहे. हे प्लान फारच स्वस्त आहेत असे नाही. यातील एक प्लान हा १९९ रुपयांचा आहे. तर एक प्लान २३९९ रुपयांचा आहे. या प्रमाणे दोन्ही प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा सोबत तर दोन प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा सोबत येते. यात तुम्हाला २८ दिवसांपासून वर्षभराची वैधता मिळते. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः रिलायन्स जिओचे बेस्ट सेलर प्लान रिलायन्स जिओचे बेस्ट सेलर प्लानची किंमत १९९ रुपये, ५५५ रुपये, ५९९ रुपये आणि २३९९ रुपये आहे. १९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळते. यात रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. या प्रमाणे युजर्संना एकूण ४२ जीबी डेटा मिळतो. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जातात. याशिवाय, जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः दुसरा प्लान ५५५ रुपयांचा आहे. ज्यात ८४ दिवसांची वैधता मिळते. सोबत रोज १.५ जीबी डेटा मिळतो. युजर्संना एकूण १२६ जीबी डेटाचा वापर करता येऊ शकतो. याच पद्धतीने ५९९ रुपयांचा प्लान असून यात ८४ दिवसांची वैधता मिळते. यात रोज २ जीबी डेटा मिळतो. युजर्संना एकूण १६८ जीबी डेटा ची सुविधा मिळते. दोन्ही प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः तिसरा आणि या यादीतील सर्वात महाग प्लान म्हणजे २३९९ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये एक वर्षाची वैधता मिळते. प्लानमध्ये ३६५ दिवसांसाठी रोज २ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच युजर्संना यात एकूण ७३० जीबी डेटाचा वापर करता येऊ शकतो. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर फ्री कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जातात. याशिवाय Jio TV, Jio Cinema आणि Jio News सारख्या अॅप्सचे फ्री अॅक्सेस दिले जाते. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30s52eg