Full Width(True/False)

डिफेंस लेवलची सिक्योरिटीचा Samsung Galaxy xCover 5 स्मार्टफोन लाँच

नवी दिल्लीः Samsung ने गुरुवारी गॅलेक्सी Xcover 5 स्मार्टफोनच्या लाँचची घोषणा केली आहे. हा रग्ड स्मार्टफोन याच महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. या फोनला ३३० GBP (जवळपास ३३ हजार ५०० रुपये) मध्ये लाँच केले आहे. वाचाः सॅमसंगच्या माहितीनुसार, Galaxy Xcover 5 मध्ये असे अनेक फीचर्स आहेत. ज्यात मल्टिटास्किंगला हँडल करू शकते. कंपनीचा दावा आहे की, १.५ मीटरची उंचीवरून पडूनही या फोनला काहीच नुकसान होत नाही. कारण, हा फोन shock absorption क्षमतेसोबत येतो. या फोनला IP68 रेटिंग दिली आहे. त्यामुळे पाणी आणि धूळ पासून सुरक्षित राहतो. दुसऱ्या सॅमसंग फोन्सप्रमाणे यात एक ग्लोव टच फीचर आहे. म्हणजेच हातात ग्लोव्स घालून याला डिस्प्ले टच केले जाऊ शकते. सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी एक्स कव्हर ५ मध्ये सॅमसंग Knox सिक्यॉरिटी सलूशन प्री-लोडेड येते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यात देण्यात आलेले डिफेंस ग्रेड सिक्योरिटी प्लॅटफॉर्म डिव्हाइसला एन्ट टू एन्ड इनक्रिप्शन ऑफर करते. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी Xcover मध्ये ५.३ इंचाचा एचडी प्लस टीएफटी डिस्प्ले दिली आहे. फोनमध्ये २.० गीगाहर्ट्ज ऑक्टा कोर एक्सीनॉस ८० प्रोसेसर सोबत येतो. यात ४जीब रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिली आहे. सॉफ्टवेयर मध्ये अँड्रॉयड ११ वर चालतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 3000mAh रिमूवेबल बॅटरी दिली आहे. फोनला १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी १६ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हँडसेट ड्यूल सिम, सिंगल सिम अशा दोन व्हेरियंट मध्ये येते. फोनमध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिंकेशन साठी फेस अनलॉक फीचर दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rluDkP