Full Width(True/False)

Airtel चा ३६५ दिवसांचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान, डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, पाहा किंमत

नवी दिल्लीः Airtel, Jio आणि Vi सर्व टेलिकॉम कंपन्यांनी करोना काळात जास्त इंटरनेटची गरज लक्षात ठेऊन जास्त वैधता असलेले डेटा प्लान आपल्या युजर्संसाठी आणले आहेत. आज आम्ही या ठिकाणी एअरटेलच्या पॅकसंबंधी सांगत आहोत. या प्लानमध्ये वर्षभराची वैधता मिळते. हा एअरटेलचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात केवळ डेटा नव्हे तर कॉलिंग आणि एसएमएसचा सुद्धा समावेश आहे. जाणून घ्या या प्लान संबंधी. वाचाः Airtel च्या या प्लानची किंमत १४९८ रुपये आहे.. यात एक वर्षभराची वैधता मिळते. म्हणजेच ३६५ दिवस या बेनिफिटचा वापर करू शकतात. या प्लानमध्ये एकूण मिळून २४ जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि ३६०० फ्री एसएमएस मिळते. अन्य बेनिफिट्स मध्ये यात एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम, फ्री ऑनलाइन कोर्स आणि फास्टॅग खरेदीवर १०० रुपयांचा कॅशबॅक, मोबाइल एडिशन फ्री ट्रायल, फ्री हेलोट्यून्स, फ्री विंक म्यूझिक आदी ग्राहकांना मिळते. वाचाः याशिवाय जिओ रिचार्ज केल्यानंतर १२९९ रुपयांत एकूण २४ जीबी डेटा मिळतो. याची वैधता ३३६ दिवस पर्यंत आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि ३६०० एसएमएस दिले जातात. Vi चा हा प्लान Airtel पेक्षा १ रुपये जास्त आहे. १४९९ रुपयांत तुम्हाला २४ जीबी डेटा प्लस ३६०० एसएमएस प्लस अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट दिले जाते. या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rlrT75