नवी दिल्लीः रिलायन्स जिओने नुकतेच १९९९ रुपयांत जिओ फोनला लाँच केले आहे. ज्यात तुम्हाला जिफो फोनसोबत दोन वर्षापर्यंत सर्वकाही फ्री मिळते. या प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंग, मेसेज, आणि इंटरनेट फ्री सुविधा देते. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, कंपनी JioPhone यूजर्स साठी पाच असे प्लान ऑफर करते. ज्यात युजर्संना जबरदस्त सुविधा मिळते. या प्लानची सुरुवात ७५ रुपयांपासून सुरू होते. ज्यात २८ दिवसांची वैधता मिळते. यात रोज 100MB डेटा मिळतो. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर 64 Kbpsस्पीड राहते. यात अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग शिवाय 50 SMS मिळते. वाचाः JioPhone चा १२५ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता २८ दिवस आहे. युजर्संना रोज ५०० एमबी डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर 64 Kbps ची स्पीड राहते. याशिवाय, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि 300 SMS फ्री मिळते. JioPhone चा १५५ रुपयांचा प्लान हा कंपनीचा बेस्ट सेलर प्लान आहे. ज्यात २८ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला रोज १ जीबी डेटा आणि १०० एसएमएस फ्री दिले जाते. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर 64 Kbps ची स्पीडने इंटरनेटचा वापर करू शकता. यात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. वाचाः JioPhone चा १८५ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात रोज २ जीबी डेटा मिळतो. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर 64 Kbps ची स्पीडने इंटरनेटचा वापर करू शकता. याशिवाय रोज १०० एसएमएस सह कॉलिंग सुविधा मिळते. JioPhoneचा ७४९ रुपयांचा प्लान या प्लानला कंपनीने नुकतेच लाँच केले आहे. या प्लानमध्ये ३६५ दिवस अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच २८ दिवसांसाठी २ जीबी डेटा आणि ५० एसएमएस मिळतो. जिओ फोनच्या या प्लान्स मध्ये JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सचा वापर फ्री करता येऊ शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qUnR4O