नवी दिल्लीः स्मार्टफोन भारतात ८ एप्रिलला लाँच केला जाऊ शकतो. परंतु, लाँच आधीच या फोनची किंमत लीक झाली आहे. या फोनची वेळोवेळी लीक्स माहिती समोर येत आहे. लेटेस्ट लीक मध्ये केवळ स्मार्टफोनची वैशिष्ट्ये रेंडर लीक झाली नाही तर किंमतीची माहिती सुद्धा ऑनलाइन लीक झाली आहे. हा कंपनीकडून लाँच केला जाणारा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असू शकतो. यासोबतच या दिवशी अन्य स्मार्टफोन्स सुद्धा लाँच केले जाऊ शकते. नोकियाच्या या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप व ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. वाचाः Nokia G10 ची किंमत Nokiapoweruser स्मार्टफोनच्या एका रिपोर्टनुसार, Nokia G10 स्मार्टफोनला एका बेस व्हेरियंट मध्ये लाँच केले जाऊ शकते. भारतात ११ हजार ९९९ रुपये असू शकते. तर यूरोपमध्ये फोनला ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजची किंमत १२ हजार ०२६ रुपये असू शकते. Nokia G10 स्मार्टफोन संबंधी माहिती लीक झाली आहे. ज्यात फोनचे रेंडर, वैशिष्ट्ये आणि किंमत आदीचा समावेश आहे. हा फोन Android 11 वर काम करतो. या फोनमध्ये ६.४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. रिपोर्टमध्ये प्रोसेसरची माहिती दिली गेली नाही. परंतु, फोनमध्ये ऑक्टा कोर चिपसेट दिला जाणार आहे. सोबत ३ जीबी आणि ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी आणि ६४ जीबी स्टोरेज ऑप्शन मिळणार आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकते. वाचाः फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. सोबत एलईडी फ्लॅश दिला जाऊ शकतो. फोनला पॉवर देण्यासाठी ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे. १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2P4JyS8