Full Width(True/False)

Vi चा मोठा धमाका, फक्त ५१ रुपयांच्या रिचार्जवर हेल्थ इन्शुरन्सचा फायदा

नवी दिल्लीः Vodafone Idea (Vi) Prepaid Plans: टेलिकॉम कंपन्या आपल्या युजर्संना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करते. आता वोडाफोन आयडिया ने आपल्या दोन खास प्रीपेड प्लान्ससोबत युजर्संना हेल्थ इन्शुरन्स देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने यासाठी आदित्य बिरला हेल्थ इन्शुरन्स सोबत पार्टनरशीप केली आहे. या नवीन स्कीमचे नाव Vi Hospicare आहे. परंतु, ही सुविधा केवळ कंपनीच्या निवडक प्रीपेड प्लान्ससोबत उपलब्ध आहे. वाचाः Vi Hospicare अंतर्गत ५१ रुपये आणि ३०१ रुपयांच्या प्रीपेड प्लान्स सोबत फ्री हेल्थ इन्शुरन्सच्या सुविधेचा लाभ मिळणार आहे. या दोन्ही प्लान्सला कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर अपडेट केले आहे. जाणून घ्या या दोन्ही प्लान्समध्ये काय काय बेनिफिट्स युजर्संना मिळणार आहे. वाचाः सर्वात आधी वोडाफोन आयडियाचा ५१ रुपयांचा प्लान संबंधी ही खास माहिती. य प्लानमध्ये युजर्संना ५०० फ्री एसएमएस दिले जाते. या प्लानमध्ये व्हाइस कॉलिंग आणि डेटा बेनिफिटची सुविधा मिळत नाही. हा प्लान केवळ २८ दिवसांच्या वैधतेसोबत येतो. या प्लान सोबत कंपनी हॉस्पिटल ट्रिटमेंट वर एक दिवसांसाठी १ हजार रुपयापर्यंत आणि ही रक्कम डबल म्हणजेच २ हजार रुपये प्रतिदीन होते. ज्यावेळी रुग्ण आयसीयूत भर्ती होतो. त्यावेळी एकदा रिचार्ज वर जास्तीत जास्त १० दिवसांपर्यंत कंपनी कडून पैसे मिळू शकतात. वाचाः आता ३०१ रुपयांच्या प्लानमध्ये रोजी १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसची सुविधा दिली जाते. हा प्लान सुद्धा २८ दिवसांच्या वैधतेसोबत येतो. तसेच या प्लान सोबत रेग्युलर हॉस्पिटल ट्रिटमेंट वर रोज १००० रुपयांपर्यंत तर आयसीयूमध्ये भर्ती झाल्यानंतर ही लिमिट वाढून रोज २ हजार रुपयांपर्यंत होते. वाचाः कोणाला मिळणार प्लानचा फायदाः तुमच्या डोक्यात हा प्रश्न आला असेल की या प्लानचा फायदा नेमका कुणाला होणार आहे. कंपनी सर्व वयोगटातील व्यक्तींना या प्लानचा फायदे देत आहे का. हो, कंपनीने सांगितले की, १८ ते ५५ वर्षापर्यंतच्या व्यक्तींना याचा लाभ मिळू शकतो. परंतु, ते कोणत्याही गंभीर आजाराने त्रस्त असता कामा नये. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/384ackN