वृत्तसंस्था, नवी दिल्ली स्टेट बँकेच्या अनेक ग्राहकांना एसबीआय क्रेडिट पॉइंट्स रोखीत बदलून घेण्याचे अर्थात हस्तांतरित करून घेण्याचे आणि त्याद्वारे सुमारे ९,८७० रुपये मिळविण्याचे आवाहन करणारे संदेश प्राप्त झाले आहेत. हे मेसेज बनावट (फिशिंग) असून, या मेसेजआडून खातेदारांची सर्व माहिती देण्यास सांगितले जात आहे. ही बाब नवी दिल्ली येथील ‘सायबरपीस फाउंडेशन’ आणि ‘ऑटोबोट इन्फोसेक प्रा. लि.’ या संस्थांनी उघड केली आहे. वाचाः सायबर हल्लेखोरांनी स्टेट बँकेची बनावट वेबसाइट तयार केली असून, या साइटच्या वेबपेजवर स्टेट बँकेच्या ग्राहकाला वैयक्तिक माहिती देण्यास सांगितले जात आहे. यामध्ये कार्ड क्रमांक, कार्डांचा मुदतपूर्ती दिनांक, सीव्हीव्ही आणि एम पिन या माहितीचा समावेश आहे. ही माहिती स्टेट बँक ऑफ इंडिया फिल युवर डिटेल्स अशा फॉर्ममध्ये भरण्यास सांगितले जात आहे. याची गंभीर दखल घेत स्टेट बँकेने सर्व खातेदारांना सावधान करण्यास सुरुवात केली आहे. वाचाः वेबसाइटविषयी संशय ‘सायबरपीस’ आणि ‘ऑटोबोट इन्फोसेक’नुसार स्टेट बँकेची कथित बनावट वेबसाइट माहितीची कोणतीही शहानिशा न करताच ती नोंदवून घेत असल्याचे आढळळे आहे. या वेबसाइटची नोंदणी स्टेट बँकेने केलेली नसून कोण्या तिसऱ्याच पार्टीने केली आहे. यामुळे बनावट वेबसाइटविषयीचा संशय बळावला आहे. शिवाय, स्टेट बँकेच्या म्हणण्यानुसार, बँक आपल्या ग्राहकांशी कधीही एसएमएस किंवा ई-मेलद्वारे संभाषण करत नाही. विशेषतः ग्राहकाच्या खात्यासंबंधी माहिती मिळवण्यासाठी बँक कधीही या दोन्ही माध्यमांचा वापर करत नाही. या बनावट वेबसाइटवरून नाव, मोबाइल क्रमांक, ई-मेल, ई-मेलचा पासवर्ड आणि जन्मदिनांक ही माहिती विचारण्यात येत आहे. ही माहिती दिल्यानंतर ‘थँक यू पेजवर’ संबंधित ग्राहकाला ही वेबसाइट घेऊन जात आहे. या वेबसाइटचे डोमेन भारतातीलच असून, ते तमिळनाडूमधील असल्याचे ‘सायबरपीस’चे म्हणणे आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3c1RlZ8