नवी दिल्लीः ओप्पोने आज भारतात आपला 48MP कॅमेराचा OPPO F19 स्मार्टफोन लाँच केला आहे. ओप्पो एफ १९ आणि एफ १९ प्रो प्लस व्हेरियंट नंतर कंपनीचा या सीरीज मधील हा तिसरा मिड रेंज मधील स्मार्टफोन आहे. ओप्पो एफ १९ मध्ये 5000mAh बॅटरी, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर, 128 जीबी स्टोरेज यासारखे खास वैशिष्ट्ये दिली आहेत. जाणून घ्या या फोनसंबंधी. वाचाः OPPO F19 ची किंमत ओप्पो एफ १९ स्मार्टफोनमध्ये देशात १८ हजार ९९० रुपये किंमतीत लाँच केले आहे. फोन प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. या फोनचा पहिला सेल ९ एप्रिल रोजी सुरू होणार आहे. कंपनी लाँच ऑफर अंतर्गत मोठ्या बँकाच्या क्रेडिट कार्डवर फ्लॅट ७.५ टक्के कॅशबॅक ऑफर करीत आहे. वाचाः OPPO F19 चे फीचर्स ओप्पो एफ १९ मध्ये ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो ९०.८ टक्के, आस्पेक्ट रेशियो २०.९ दिला आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज दिला आहे. स्मार्टफोनची स्क्रीनवर फ्रंट कॅमेरासाठी पंच होल कटआउट दिला आहे. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम ६६२ प्रोसेसर दिला आहे. ओप्पोचा हा फोन ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. वाचाः फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. ओप्पो एफ १९ मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक फीचर दिले आहे. ओप्पोचा हा फोन अँड्रॉयड ११ बेस्ड कलरओएस 11.1 वर काम करतो. फोनची रुंदी ७.९५ मिलीमीटर आणि वजन १७५ ग्रॅम आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअफ दिला आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wuHRyM