नवी दिल्लीः HP Chromebook 11a लॅपटॉपला भारतात लाँच करण्यात आले आहे. या क्रोमबुकला खास किड्स म्हणजे विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेऊन लाँच करण्यात आले आहे. करोना महामारी संपेपर्यंत आपली ऑनलाइन क्लास सुरू राहणार आहे. याचे वजन एकदम १ किलोग्रॅम आहे. यात मीडियाटेक एमटी ८१८३ ऑक्टा कोर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये व्हाइस एनेब्ल्ड गुगल असिस्टेंट आणि १ वर्षासाठी गुगल वनचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. गुगल वन १०० जीबी क्लाउड स्टोरेज, १ वर्षासाठी गुगल एक्सपर्ट्सचे अॅक्सेस आणि अन्य एक्सक्लूसिव्ह मेंबर बेनिफिट्स देते. वाचाः HP Chromebook 11a फीचर्स या लॅपटॉप मध्ये क्रोम ओएसवर काम करतो. या डिव्हाइस मध्ये गुगल प्ले स्टोरवर अॅक्सेस मिळतो. लॅपटॉप मध्ये ११.६ इंचाचा एचडी (1,366x768 पिक्सल) आयपीएस टच डिस्प्ले दिला आहे. ब्राइटनेस 220 निट्स, कलर गेमट 45 प्रतिशत आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 73.8 टक्के दिला आहे. लॅपटॉपमध्ये मीडियाटेक MT8183 ऑक्टा-कोर चिपसेट सोबत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिला आहे. याशिवाय गुगल वन कडन १०० जीबी क्लाउड स्टोरेज मिळणार आहे. स्टोरेजला २५६ जीबी पर्यंत वाढवणे शक्य होणार आहे. वाचाः HP Chromebook 11a चे वजन 1.05 किलोग्रॅम आहे. तसेच यात 37 WHr Li-Ion पॉलिमर बॅटरी दिली आहे. या लॅपटॉप मध्ये १६ तासांपर्यंत बॅटरी लाइफ ऑफर करते. यात यूएसबी टाइप ए पोर्ट आणि यूएसबी टाइप सी पोर्टचा समावेश आहे. कनेक्टिविटीसाठी यात वाय फाय ५ आणि ब्लूटूथ ५ दिले आहे. याची लांबी आणि उंची रुंदी 285x192.8x16.8 मिलीमीटर आहे. या लेटेस्ट लॅपटॉपमध्ये एचपी ट्रू व्हिजन एचडी वेब कॅमेरा दिला आहे. वाचाः HP Chromebook 11a ची किंमत नवीन एचपी क्रोमबुक ११ ए ची भारतातील किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. लॅपटॉपला एकाच कलर मध्ये उतरवले आहे. इंडिगो ब्लू आणि हे एक्सक्लूसिव म्हणून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येऊ शकते. लॅपटॉप सोबत एक वर्षासाठी गुगल वन मेंबरशीप दिली जात आहे. याचाच अर्थ १०० जीबी क्लाउड स्टोरेजचा फायदा या लॅपटॉप सोबत मिळू शकतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PudbND