नवी दिल्लीः Ambrane ने देशात वायरलेस नेकबँडची नवीन रेंज लाँच केली आहे. कंपनीने आपले प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करीत ५ नवीन लाँच केले आहे. याची किंमत १२९९ रुपयांपासून सुरू होते. नेकबँड्स मध्ये सुविधाजनक डिझाइन, हाय बेस आणि मोठी बॅटरी लाइफ सारखे खास फीचर्स दिले आहेत. कंपनी या नेकबँड वर ३६५ दिवसांची वॉरंटी ऑफर देत आहे. वाचाः सर्वात आधी बेसबँड प्रो नेकबँडची किंमत २ हजार १९९ रुपये आहे. तर बेसबँड लाइटची किंमत १२९९ रुपये आहे. मेलोडी सीरीजमध्ये कंपनीने दोन नेकबँड लाँच केले आहे. मेलोडी २० ची किंमत १४९९ रुपये आणि मेलोडी ११ ची किंमत १७९९ रुपये आहे. याशिवाय, ट्रेंड्ज ११ नेकबँडची स्पोर्टी आणि क्लासी नेकबँडची किंमत १ हजार ९९९ रुपये आहे. या सर्व वायरलेस नेकबँड्सला अँब्रेनच्या वेबसाइट शिवाय अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टची वेबसाइट वरून खरेदी करता येऊ शकते. वाचाः BassBand Pro मध्ये एचडी साउंड एक्सपीरियन्ससाठी डायनामिक फीचर्स दिले आहेत. या नेकबँड मध्ये ६ तासांपर्यंत बॅटरी लाइफ मिळत असल्याचा दावा केला जात आहे. सुविधाजनक वापरासाठी हे वायरलेस ईयरबँड स्टायलिश आणि जबरदस्त डिझाइन सोबत येते. हे ईयरफोन IPX5 वॉटर रेसिस्टेंट फीचर सपोर्ट करते. BassBand Lite, हे नावावरूनच कळते की, Bassband Pro चे लाइट वर्ज़न आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या बँडला प्रीमियम ऑडियो एक्सपीरियन्स देण्यासाठी खास डिझाइन करण्यात आली आहे. वाचाः Melody 20 और Melody 11 मध्ये ड्यूल स्टीरियो आउटपुट मिळते. या नेकबँड मध्ये 10mm ड्राइवर्स दिले आहे. ज्याला हाय डिटेल साउंड मिळते. अडवॉन्स टेक्नोलॉजी देत मेलोडी २० मध्ये मोठी बॅटरी दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार २ तासांच्या चार्जिंग मध्ये ८ तासांची बॅटरी लाइफ तर मेलोडी ११ मध्ये ६ तासांची बॅटरी लाइफ मिळते. Trendz 11 मध्ये डीप बेस टेक्नोलॉजी आहे. जबरदस्त म्यूझिक एक्सपीरियन्स ऑफर करते. हे ईयरबड्स ६ तासांचे प्लेबॅक टाइफ ऑफर करते रोज वापरासाठी हे जबरदस्त आहे. वाचाः अँब्रेनच्या या सर्व नेकबँड मध्ये स्मार्ट व्हाइस असिस्टेंट, गुगल असिस्टेंट आणि सीरी सपोर्ट मिळते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, रनिंग, जॉगिंग किंवा जिमचा वापरासाठी हे नेकबँड सुविधाजनक आहेत. याशिवाय, हे मॅग्नेटिक क्लॅप्स सोबत येते. या नेकबँड मध्ये क्रिस्टल क्लियर कॉलिंग एक्सपीरियन्स साठी इन बिल्ट मायक्रोफोन दिले आहेत. यामुळे म्यूझिक आणि कॉल सहज स्विच करता येऊ शकतात. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sTrKZf