नवी दिल्लीः पोकोचा लेटेस्ट स्मार्टफोन चा आज पहिला सेल आहे. १८ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमती सोबत या फोनचा सेल आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. पहिल्या सेलमध्ये कंपनी या फोनला अनेक आकर्षक ऑफर सोबत खरेदी करण्याची संधी देत आहे. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शन वर युजर्संना १ हजार रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. वाचाः याशिवाय, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून शॉपिंक केल्यास तुम्हाला ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळणार आहे. फोनला एक्सचेंज ऑफर मध्ये खरेदी केल्यास १६ हजार ५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. वाचाः Poco X3 Pro चे फीचर्स ड्यूल नॅनो सिम सपोर्ट सोबत येणाऱ्या या फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डॉट डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 120Hz चे डायनामिक रिफ्रेश रेट देण्यात आले आहे. ८ जीबी पर्यंत LPDDR4x रॅम आणि १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 860 SoC दिले आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी पोको एक्स ३ प्रो च्या बॅक पॅनेलवर तुम्हाला एलईडी फ्लॅश सोबत चार कॅमेरे मिळणार आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल शूटर, एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर दिला आहे. सेल्फी साठी या फोनमध्ये २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,160mAh ची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. कनेक्टिविटीसाठी यात 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0 आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे ऑप्शन दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cXh86t