नवी दिल्लीः सोशल मीडियावरील फेसबुकचा कोट्यवधी लोक वापर करीत आहेत. भारतात सुद्धा फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. परंतु, गेल्या काही दिवसांपासून फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसाठी दिवस थोडे अडचणीचे ठरू लागले आहेत. अनेकदा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना कोर्टात हजेरी लावावी लागली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकदा प्रायवसीवरून प्रश्न उपस्थित केले गेले आहे. वाचाः फेसबुकचे सीईओ आपल्या सुरक्षेवर खूपच जास्त पैसे खर्च करीत आहेत. यावर खर्च होणारी रक्कर ऐकल्यानंतर तुम्हाला धक्काच बसेल. झुकरबर्ग यांनी २०२० मध्ये आपल्या सिक्योरिटीवर एकूण २३ मिलियन डॉलर्स म्हणजेच १७२ कोटी रुपये खर्च केले होते. ही किंमत थोडी नाही. खूपच जास्त आहे. याचा खुलासा युनायटेड स्टेट्स सिक्योरिटी एन्ड एक्सचेंज कमिशनने केला आहे. वाचाः कमिशनने यासंबंधी माहिती देताना सांगितले की, झुकरबर्ग यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा वाढवण्यासाठी रक्कम आणखी वाढली आहे. तसेच यात करोनाचे नियम पासून अमेरिका निवडणूक २०२० आणि दुसरी रिस्कचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबासाठी सिक्योरिटी ठेवावी लागते. वाचाः झुकरबर्ग आपल्या कुटुंब, घर, प्रवास, आणि अन्य दुसऱ्या वस्तूंवर इतका पैसा खर्च करीत आहेत. सिक्योरिटी पर्सनल खर्चापासून रोजच्या खर्चासाठी झुकरबर्ग एक्स्ट्रा १० मिलियन डॉलर्स खर्च करीत आहेत. वर्ष २०२० मध्ये बेस सिक्योरिटीचा खर्च १३.४ मिलियन डॉलर्स होता. तो २०१९ मध्ये १०.४ मिलियन डॉलर्स होता. वाचाः सीईओ झुकरबर्गचा डेटा लीक झाला आहे नुकताच फेसबुकच्या ५३३ कोटी युजर्संचा डेटा लीक झाला आहे. या लीक मध्ये सीईओ मार्क झुकरबर्गचा फोन नंबर सुद्धा लीक झाला आहे. हॅकर्सने फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांचा फोन नंबर आणि पर्सनल डेटाला सार्वजनिक केले होते. नंतर फेसबुकने म्हटले की, हे प्रकरण जुने आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wNn2ie