नवी दिल्लीः कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी टीसीएल ने सोमवारी इंडियन मार्केटमध्ये फक्त १९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत तीन ट्रू वायरलेस स्टीरियो (टीडब्ल्यूएस) ईयरबड लॉन्च केले आहे. कंपनीने म्हटले की, १५ एप्रिल पासून याची फ्लिपकार्टवर विक्री सुरू होणार आहे. S150, MoveAudio S200 आणि ACTV500 ईयरबड्सला तुम्ही अनुक्रमे १९९९ रुपये, ३९९९ रुपये आहे. ४४९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. टीसीएल मोबाइलचे कंट्री मॅनेजर सुनील वर्मा यांनी म्हटले की, या लाँचिंग सोबत आम्ही आपल्या ऑडियो सेगमेंटचा विस्तार वाढवण्यासाठी आणि टीडब्ल्यूएस श्रेणी पुढे नेण्याासाठी तयार आहोत. वाचाः MoveAudio S150 चे फीचर्स S150 मध्ये आयपीएक्स ४ वॉटरप्रूफिंग, मोठी बॅटरी सोबत स्मार्ट कंट्रोल दिले आहे. एकदा चार्ज केल्यानंतर तीन तासांपर्यंत म्यूझिक ऐकू शकता. यात 13mm चे ड्रायवर दिले आहे. नॅचरल आणि ऑथेंटिक साउंड देते. यात Bluetooth v5.0 आणि फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी दिली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, १५ मिनिटापर्यंत चार्ज केल्यास यात ४ तासांपर्यंत म्यूझिक ऐकले जाऊ शकते. वाचाः चे फीचर्स MoveAudio S200, कॉम्पॅक्ट ईयरबड्स आहे. जे विना टँग्ल्सचे विना बे पॉवर्ड ऑडियोचा अनुभव देते. हे ईयरबड्स नाइट कॅन्सिलेशन (ENC) टेक्नोलॉजी सोबत येते. जे बॅकग्राउंड नॉइजला फिल्टर करू शकते. एकदा चार्ज केल्यानंतर ३.५ तासपर्यंत चालवले जाऊ शकते. हे ईयरफोन सुद्धा ब्लूटूथ v5.0 सोबत येते. वाचाः TWS चे फीचर्स ACTV500 ला शक्तिशाली 6 mm ड्राइवर सोबत बनवले गेले आहे. ज्यात क्लियर साउंड आणि पंची बेस मिळते. हे ३३ तासांच्या बॅटरी लाइफ सोबत येते. यात USB Type-C चार्जिंग पोर्ट सोबत चार्ज केले जाऊ शकते. कंपनीने म्हटले की, आयपीएक्स ५ सर्टिफाइड आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32cMwYl