मुंबई- एम टीव्हीवरील रोडीज रिवॉल्यूशन या प्रसिद्ध शोमध्ये सहभागी झालेला स्पर्धक आणि मॉडेल याने मनोरंजनसृष्टी कायमची सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता यापुढचं आयुष्य इस्लाम धर्माचं पालन करण्यात घालवण्याचा निर्णय साकिबने घेतला आहे. साकिबने आपला निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला आहे. आपला निर्णय जाहीर करताना साकिबने एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवरील या पोस्टमध्ये साकीबने लिहिले की, 'तुम्ही सर्वजण उत्तम असाल अशी मला आशा आहे. आज या पोस्टमधून मी एक घोषणा करत आहे, ती म्हणजे आजपासून मनोरंजनसृष्टीला कायमचा रामराम करण्याचा मी निर्णय घेतला आहे. भविष्यात मी मॉडेलिंग आणि अभिनय करणार नाही. माझ्याकडे काम नाही किंवा मी हार मानली, असे अजिबात नाही. आजही माझ्याकडे खूप चांगले प्रोजेक्ट आहेत. पण मी ते करावेत अशी अल्लाहची इच्छा नव्हती. अल्लाहने माझ्यासाठी अधिक चांगले आणि उत्तम काहीतरी नियोजनले असेल. इंशाअल्लाह...' 'तो सर्वोत्तम गोष्टी रचणारा आहे. जेवढे मी पाहिले आहे त्यानुसार मुंबईत आयुष्य काढणे खूप कठीण आहे. येथे जगताना खूप संघर्ष करावा लागलो, परंतु मला अभिमान आहे की अवघ्या एका वर्षात मला येथे प्रसिद्धी आणि चाहत्यांचे खूप सारे प्रेम मिळाले. परंतु जगताना आणि मृत्यूनंतर त्याचा काहीच उपयोग नसतो. हे सातत्याने मला जाणवत होते. आता अल्लाहला शरण जाणार साकिब पुढे लिहितो की, ' मी जेव्हा जेव्हा नमाज अदा करायचो तेव्हा मला कसली तरी उणीव भासायची. त्यामुळे मनाला शांतता लाभायची नाही. परंतु आता संपूर्णपणे मी अल्लाहला शरण जात आहे.आता मला नक्कीच शांतता मिळेल. मी अल्लाचा आभारी आहे की त्याने मला पश्चात्ताप करण्याची आणि मनापासून मला स्वीकारण्याची संधी दिली. कारण मला माझ्या आयुष्यात चमत्कार घडताना दिसत आहेत,' अशा भावना साकिबने आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत. साकिब खान वकील होता साकिब खान याने वकिलीचे शिक्षण घेतले आहे. वकीली करत असतानाच रोडीज रेव्होल्युशन तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यावर त्याने स्वतःची ओळख करून देताना सांगितले की, ' मी काश्मिरचा असून, मी दगड फेकणारा नाही,' अशी त्याने स्वतःची ओळख करून दिल्यानंतर त्याच्याबद्दल सर्वांचे मत वेगळे झाले होते. मुंबईतील लोकांच्या मनात काश्मिरी लोकांचे जे चित्र आहे ते बदलण्यासाठी आपण मुंबईत आल्याचेही त्याने यावेळी सांगितले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dF3tA1