नवी दिल्लीः देशाची सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक स्टेट बँक ऑफ इंडिया () मध्ये फिक्स्ड डिपॉझिट ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी बँकेने एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना अलर्ट करताना म्हटले की, काही फ्रॉड एसबीआय बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून फिक्स्ड डिपॉझिट करण्याचे सांगतात. तसेच या निमित्ताने ते ग्राहकांकडून माहिती करून घेतात. वाचाः SBI ने ट्विटर वर एक पोस्ट करून ग्राहकांना या स्कॅम बद्दल अलर्ट केले आहे. यापासून दूर राहण्याची सूचना सुद्धा बँकेने आपल्या ग्राहकांना केली आहे. या ट्विटमध्ये एसबीआय ने म्हटले की, नुकत्याच काही रिपोर्ट्समधून हे समोर आले आहे की, सायबर क्रिमिनल बँक कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी ग्राहकांच्या अकाउंट मध्ये ऑनलाइन फिक्स्ड डिपॉझिट क्रिएट करीत आहेत. वाचाः यासोबतच बँकेने हेही लिहिले आहे की, आम्ही आपल्या सर्व ग्राहकांना आवाहन करतो की, कोणालाही बँक डिटेल्स शेयर करू नका. फसवणूक करण्याच्या भानगडीत पडू नका. जे स्वतःला एसबीआय कर्मचारी असल्याचे सांगतात. आम्ही कुणालाच कधीच Password, OTP, CVV, Card नंबर यासारखे मागत नाहीत. वाचाः गेल्या काही वर्षापासून बँक संबंधित सायबर गुन्हेगारांची संख्या लागोपाठ वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांनी स्वतः अलर्ट राहून या फ्रॉड़पासून दूर राहावे. बँक किंवा बँकेचे कर्मचारी कधीच पासवर्ड, सीव्हीव्ही, कार्ड नंबर आणि ओटीपीची माहिती विचारत नाही. वाचाः फ्री गिफ्टच्या चक्करमध्ये पडू नका जर तुम्हाला कोणी कॉल करून फ्री गिफ्ट किंवा रिवॉर्ड मनी देण्याचे अमिष दाखवत असेल तर त्याला बळी पडू नका. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3umzBz4