मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता याचा आज ३८ वा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या अल्लू अर्जुनचा देशात आणि परदेशातही बराच मोठा चाहता वर्ग आहे. पण ज्याचा एवढा मोठा चाहता वर्ग आहे तो अल्लू अर्जुन मात्र पत्नी स्नेहाचा चाहता आहे. अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डीची लव्हस्टोरीसुद्धा एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. विशेष म्हणजे एवढा मोठा सुपरस्टार असलेल्या अल्लू अर्जुनला लग्नाची परवानगी मिळवण्यासाठी स्नेहाच्या वडिलांची बरीच समजूत काढावी लागली होती. अल्लू अर्जुन आणि पहिल्यांदा त्यांच्या मित्राच्या लग्नात भेटले होते आणि स्नेहाला पाहताक्षणी अल्लू अर्जुन तिच्या प्रेमात पडला होता. स्नेहादेखील अल्लू अर्जुनला पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडली होती. मग काय तिथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. मित्राच्या लग्नातच दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. त्यानंतर त्या दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. स्नेहा तिचं मास्टर्स पूर्ण करून भारतात परत आली होती. अल्लू अर्जुन हे नाव तिच्यासाठी मुळीच नवीन नव्हतं कारण तेव्हा अल्लू अर्जुनचं नाव तेलगू चित्रपटांत गाजत होतं. स्नेहा हैदराबादच्या एका प्रसिद्ध व्यावसायिकाची मुलगी आहे. जेव्हा अल्लू अर्जुन आणि स्नेहाने त्यांच्या घरी आपल्या लग्नाबद्दल सांगितलं तेव्हा अल्लूच्या वडिलांनी लग्नाला लगेच होकार दिला. मात्र स्नेहाच्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला होता. अल्लू अर्जुन आणि त्याचे वडील स्नेहाच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेले होते. पण स्नेहाच्या वडिलांनी त्यांचा प्रस्तावाला नकार दिला. पण अल्लू अर्जुन आणि स्नेहा एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. त्यामुळे हार न मानता त्यांनी स्नेहाच्या वडीलांची या लग्नसाठी परवानगी मिळवलीच. घरातल्यांची परवानगी घेण्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली होती. घरातल्यांनी होकार दिल्यानंतर दोघांनी थाटामाटात लग्न केलं. अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांचा विवाह ६ मार्च २०११ रोजी झाला होता. आज ते त्यांच्या संसारात अत्यंत सुखी असून त्यांना आर्यन आणि अरहा अशी दोन मुलं आहेत. अल्लू अर्जुन हा प्रसिद्ध तेलगू दिग्दर्शक अल्लू अरविंद यांचा मुलगा आहे आणि प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी यांचा भाचा आहे. ८ एप्रिल १९८३ रोजी जन्मलेल्या अल्लू अर्जुननं २००३ मध्ये 'गंगोत्री' चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर त्यानं 'आर्या', 'बन्नी', 'हॅप्पी', 'वेसमुडुरू', 'शंकरदादा जिंदाबाद', 'परुगु', 'आर्या २', 'वरुडु', 'वेदम', 'ब्रदीनाथ', 'वैंकुंठपुरमल्लू' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. लवकरच तो 'पुष्पा' चित्रपटात रश्मिका मंदानासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cZNnSd