मुंबई- देशावरील करोना संकट वाढत असल्याचं चित्र आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढते आहे. त्यात बॉलिवूडवरही करोनाचा प्रभाव दिसून येत आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली आहे. अभिनेता अक्षय कुमारला देखील करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याला इस्पितळात भरती करण्यात आलं आहे. या सर्व परीस्थितीमुळे ३० एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये येणारा देखील प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने जाहीर केलेली नवीन नियमावली लक्षात घेऊन चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात लागू झालेल्या रात्रीची संचारबंदी, विकेंड लॉकडाउनचा फटका चित्रपटाच्या कमाईवर होणार असल्याने निर्मात्यांनी 'सूर्यवंशी' प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट मागील वर्षी २४ मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, लॉकडाउनमुले ते शक्य झालं नाही. त्यानंतर पुन्हा एकदा दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याची चर्चा होती. यापूर्वी अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांचा 'चेहरे' आणि यशराज चोप्रा फिल्म्स यांचा 'बंटी और बबली' या चित्रपटांचं प्रदर्शन थांबवण्यात आलं आहे. आता एप्रिल महिन्यात फक्त दोन चित्रपट मैदानात आहेत. त्यातील पहिला म्हणजे अभिषेक बच्चन आणि इलियाना डिक्रूज यांचा चित्रपट आहे. जो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तर दुसरा म्हणजे बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत चा चित्रपट आहे.हा चित्रपट २३ एप्रिल रोजी देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. 'सूर्यवंशी' च्या प्रदर्शित न होण्याने अक्षयच्या पुढील चित्रपटांवर त्याचा जास्त परिणाम होणार आहे. अक्षयचे ‘अतरंगी रे’, ‘पृथ्वीराज’, ‘बेल बॉटम’ आणि ‘बच्चन पांडे’ हे चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fJsvk2