नवी दिल्लीः फेसबुक डेटावरून वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आता एक बातमी समोर आली असून फेसबुकवरून ५३ कोटी हून जास्त लोकांचा पर्सनल डेटा ऑनलाइन लीक झाला आहे. यात १०६ देशातील युजर्संचा समावेश आहे. भारतातील जवळपास ६० लाख लोकांची पर्सनल डेटा फेसबुकवरून लीक झाला आहे.सिक्योरिटी रिसर्चर Alon Gal ने याची माहिती देताना सांगितले की, याचा डेटा खूप मोठा आहे. वाचाः इनसाइडरच्या माहितीनुसार, यात सर्वात जास्त डेटा हा युजर्स (३ कोटीहून जास्त) पर्सनल डेटाचा समावेस आहे. ब्रिटनमधील १ कोटी युजर्स अकाउंटचा डेटा पब्लिकमध्ये उपलब्ध आहे. या डेटा मध्ये युजर्संचे फोन नंबर, फेसबुक आयडी, पूर्ण नाव, लोकेशन, बर्थडे, बायो सह अन्य काही इमेल अॅड्रेसचा समावेश आहे. हा डेटा ऑनलाइन फ्री मध्ये उपलब्ध आहे. कोणताही हॅकर्स याचा चुकीचा फायदा घेऊ शकतो. फेसबुकने सांगितले की, डेटा २०१९ च्या एका सिक्योरिटीच्या कमी मुळे लीक झाला होता. या इशूला २०१९ मध्ये फिक्स करण्यात आले होते. Facebook ने BleepingComputer ला सांगितले की, हा जुना डेटा आहे. या डेटाला २०१९ मध्ये लीक करण्यात आले होते. याला २०१९ च्या ऑगस्ट मध्ये फिक्स करण्यात आले होते. वाचाः I Been Pwned डेटाबेस चे क्रिएटर Troy Hunt च्या माहितीनुसार, २५ लाख लोकांच्या ईमेल अॅड्रेस लीक झाले आहे. परंतु, सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात मोबाइल नंबरचा समावेश आहे. Troy Huntने यासाठी Have I Been Pwned वेबसाइट वर लीक ईमेल अॅड्रेसला लोड केले आहे. या वेबसाइटवर जाऊन तुम्ही तुमचा ईमेल अॅड्रेस चेक करू शकता की तो लीक झाला की नाही. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39HNWyi