Full Width(True/False)

विवाहित निर्मात्याशी लग्न ते व्हायरल फोटो, वाचा अभिनेत्रीच्या कॉन्ट्रोव्हर्सी

मुंबई: अभिनेत्री यांनी बराच काळ बॉलिवूडवर राज्य केलं. जया प्रदा यांचा जन्म ३ एप्रिल १९६२ रोजी झाला होता. आज त्या ६६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. जया प्रदा यांचं खरं नाव ललिता राणी आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी त्यांनी स्वतःचं नाव बदलून जया प्रदा असं ठेवलं. अभिनय क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी राजकारणात एंट्री केली आणि त्या ठिकाणीही स्वतःची वेगळी छाप सोडली. जया प्रदा त्यावेळी केवळ १४ वर्षांच्या होत्या जेव्हा त्यांना चित्रपटाची ऑफर मिळाली. शाळेच्या एका कार्यक्रमात डान्स करत असताना दाक्षिणात्या चित्रपट सृष्टीतील एका दिग्दर्शकांनी त्यांना आपल्या चित्रपटात काम दिलं. त्यानंतर 'सरगम' चित्रपटातून जया प्रदा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. राजकारणातील त्यांच्या एंट्रीविषयी बोलायचं तर त्यांनी पहिल्यांदा १९९४ मध्ये तेलुगू देशम पार्टीमधून निवडणूक लढवली होती. पण या दरम्यान त्या अनेदा वादाच्या भोवऱ्यातही सापडल्या आहेत. दलीप तहिल आणि जया प्रदा वाद जया प्रदा यांचं नाव वादांशी नेहमीच जोडलं गेलं आहे. जेव्हा त्या अभिनय क्षेत्रात आपलं करिअर करत होत्या त्यावेळी त्यांचं नाव त्यांचे सहकलाकार दलीप तहिल यांच्याशी अनेकदा जोडलं गेलं होतं. असं म्हटलं जातं की, एका चित्रपटाचा एक सीन शूट करतेवेळी दलीप तहिल यांनी जया प्रदा यांना घट्ट मिठी मारली होती ज्यानंतर जया प्रदा यांनी दलीप यांच्या कानशिलात लगावली होती. ज्यानंतर याची खूप चर्चा सुद्धा झाली होती. अमर सिंह आणि जया यांचा वाद जया प्रदा यांना राजकारणात आणणारी व्यक्ती अमर सिंह होते असं म्हटलं जातं. अभिनेत्रीनं स्वतःच अमर सिंह आपले गॉडफादर असल्याचं मान्य केलं होतं. या दोघांचे एकत्र असतानाचे फोटो अनेकदा व्हायरल झाले होते. या नंतर अभिनेत्रीवर प्रश्न उपस्थित केले गेले होते. यावर स्पष्टीकरण देताना जया यांनी दोघांचेही फोटो चुकीच्या पद्धतीनं व्हायरल केले गेल्याचं म्हटलं होतं. आजम खान यांची कमेंट जया प्रदा आणि आजम खान एकेकाळी समाजवादी पार्टीमध्ये एकत्र काम करत होते. मात्र अनेकदा आजम खान यांनी जया प्रदा यांच्यावर टीका केली आहे. २००९ मध्ये जया प्रदा यांनी आजम खान यांच्यावर अश्लील फोटो व्हायरल केल्याचा आरोप लावला होता. यावेळी जया म्हणाल्या होत्या की, या सर्व गोष्टींमुळे मला धक्का बसला होता. त्यानंतर अमर सिंह यांनीच मला पाठिंबा दिला होता. एवढंच नाही तर आजम खान यांनी अभिनेत्रीच्या अंडर गार्मेंट्सवरही कमेंट केली होती. एकदा जया प्रदा यांनीही आजम खान यांच्यावर टीका केली होती. त्या म्हणाल्या जेव्हा मी 'पद्मावत' चित्रपट पाहिला त्यावेळी खिल्जीच्या व्यक्तिरेखेनं मला आजम खान यांची आठवण करून दिली. कशाप्रकारे त्यांनी मला निवडणूकांच्या दरम्यान त्रास दिला होता. जया यांच्या या टीकेनंतर प्रतिक्रिया देताना आजम खान म्हणाले होते, 'पद्मावतीनं खिल्जी तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच प्राण सोडले होते. पण आता एका नाचणाऱ्या महिलेनं माझ्यावर टीका केली आहे. जर मी एका नाचणारीच्या प्रत्येक टीपणीचं उत्तर देऊ लागलो तर मग राजकारणावर लक्ष कसं देणार.' आजम खान यांच्या या वक्तव्यानंतर बरेच वाद झाले होते. लग्नाचा वाद जया प्रदा यांनी १९८६ मध्ये निर्माता श्रीकांत नाहटा यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांचं हे लग्न बरंच चर्चेत राहिलं होतं. या त्यांच्या या लग्नावरून बरेच वादही झाले होते कारण श्रीकांत विवाहित आणि तीन मुलांचे वडिल होते. जया यांच्याशी लग्न करण्यासाठी त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला सोडून दिलं होतं. ज्यामुळे जया यांच्यावर खूप टीका झाली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wprW4D