मुंबई- सध्या देशभरात करोनानं पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. करोनाचा प्रभाव बॉलिवूडसोबतच मराठी चित्रपटसृष्टीवरही दिसून येत आहे. सगळीकडे भीतीचं वातावरण असताना महाराष्ट्र सरकारने १५ दिवसांसाठी कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला. परंतु, काही दिवसांपूर्वी लोकप्रिय मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांनी लॉकडाउनसंदर्भात एक ट्वीट केलं होतं. हे ट्वीट करणं त्यांना महागात पडल्याचं दिसतंय. सरकारने करावा की नाही याबाबतीत आधीपासूनच सगळ्यांमध्ये मतमतांतरं दिसून येत होती. अनेकांना ते योग्य वाटत होतं तर अनेकांना चुकीचं. महेश यांनीही त्यांचं मत ट्वीटद्वारे मांडलं होतं. त्यांनी लिहिलं, 'पण लॉकडाउन हे उत्तर नाही.' त्यांच्या या ट्वीटने अनेकांच्या रागाचा पार चढलेला पाहायला मिळाला. त्यांचं हे ट्वीट अनेकांना पटलेलं नव्हतं. नेटकऱ्यांनीही त्यांना प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काहींनी त्यांची बाजू घेत ते योग्य असल्याचं म्हटलं. तर काहींनी त्यांचा विरोध केला. नेटकऱ्यांनी आमच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास तुम्ही जबाबदारी घेणार का, असे प्रश्नही त्यांना विचारले. एका युझरने त्यांना जाब विचारत लिहिलं, 'मागील वर्षी तुम्ही कुठे गेला होतात? त्यावेळी एवढे थोर विचार आठवले नाहीत का? लॉकडाउन उत्तर नसेल तर दुसरं काय आहे ते पण सांगा जनतेला. तुम्ही मराठी प्रेक्षकांच्या मनात एवढी चांगली जागा बनवली आहे अशा पोस्टने ती खराब करू नका.' तर दुसऱ्या युझरने त्याची परिस्थिती सांगत लिहिलं, 'माझी परिस्थिती हलाखीची आहे, रिक्षा आहे, कुठून हफ्ते फेडायचे? वडील कोविड पॉझिटिव्ह निघाले आहेत. खूप त्रास होतोय. सध्या जीव वाचवणं हीच खरी कमाई.' तर अनेक युझर्सनी महेश यांच्या बाजूनेही ट्विट केले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uThYHt