मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता यांचं पुस्तक ': The Emotional Life of an Actor' नुकतंच प्रकाशित झालं. मागच्या काही काळापासून कबीर बेदी त्यांच्या या पुस्तकामुळे बरेच चर्चेत आहेत. या पुस्तकात त्यांच्या खासगी आयुष्याबद्द अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान या पुस्तकाच्या प्रकाशननंतर दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मुलगा सिद्धार्थ आणि त्याच्या आत्महत्येसंदर्भात अनेक खुलासे केले आहेत. आपलं पुस्तक 'Stories I Must Tell' च्या प्रकाशनाच्या निमित्तानं बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत कबीर बेदी यांनी त्यांचा मुलगा सिद्धार्थ बेदीच्या आत्महत्येबद्दल काही खुसासे केले आहेत. १९९७ मध्ये सिद्धार्थनं वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षीच आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं होतं. कबीर बेदी म्हणाले, 'तो एक चांगला व्यक्ती होता. त्याच्याकडे असामान्य क्षमता होती. पण अचानक एक दिवस त्याची विचार शक्तीच संपली, त्याला कोणत्याच गोष्टीचा सारासार विचार करता येणं बंद झालं होतं.' कबीर बेदी पुढे म्हणाले, 'त्याची नेमकी समस्या काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, जवळपास तीन वर्ष आम्हाला त्याच्यासोबत नेमकं काय घडतंय हे समजत नव्हतं आणि एक दिवस अचानक भर रस्त्यात त्याचा रागीट अवतार पाहायला मिळाला, त्यावेळी त्याला आवरायला ८ पोलिसांची गरज पडली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला सीझोफ्रेनिया असल्याचं निदान केलं. त्याच्यावर बराच काळ उपचार करूनही त्याला वाचवू न शकल्याचं दुःख आजही आहे. अनेक प्रयत्न करूनही आम्ही त्याला वाचवू शकलो नाही कारण त्यानं आमच्यापासून कायमचं दूर होण्याचा निर्णय आधीच घेतला होता.' कबीर बेदी यांचं पुस्तक 'Stories I Must Tell: The Emotional Life of an Actor' नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्या मुलाचा उल्लेखही केला आहे. हे पुस्ताक त्यांनी लॉकडाऊन २०२० मध्ये लिहिलं आहे. या पुस्तकात कबीर बेदी यांनी त्यांची लग्नं, लव्ह लाइफ आणि रिलेशनशिपबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी या पुस्तकात अभिनेत्री परवीन बाबी आणि पहिली पत्नी प्रतिमा यांच्यासोबतच्या नात्यावरही सविस्तर भाष्य केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sjOO2i