मुंबई: निर्माती सध्या तिच्या आगामी वेब सीरिजमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. आगामी वेब सीरिज ''चं पोस्टर लॉन्च होताच ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. निर्माती एकता कपूरवर चोरीचा आरोप लावण्यात आला होता. एकता कपूरनं या वेब सीरिजचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर चित्रपट 'लोएव'च्या मेकर्सनी एकता कपूर आणि '' प्रोडक्शनवर पोस्टर चोरीचा आरोप केला होता. त्यानंतर झालेल्या वादानंतर ऑल्ट बालाजीनं हे पोस्टर डिलीट करून संबंधित चित्रपटाच्या मेकर्सची माफी मागितली आहे. निर्माती एकता कपूरचं प्रोडक्शन हाऊस ऑल्ट बालाजीनं काही दिवसांपूर्वीच त्यांची आगामी वेब सीरिज 'हिज स्टोरी'चं पोस्टर रिलीज केलं होतं. यानंतर चित्रपट निर्माता सुधांशू सरिया यांनी त्यांच्या 'लोएव' चित्रपटाचं पोस्टर ऑल्ट बालाजीनं चोरलं आहे असा आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. सुधांशू यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'ही इंडस्ट्री अशी का आहे. जेव्हा मी सकाळी उठलो तेव्हा मला समजलं ज्या पोस्टरसाठी आम्ही अनेक महिने कठोर मेहनत घेतली ते पोस्टर ऑल्ट बालाजीच्या बुद्धिमान लोकांनी कोणतीही परवानगी न घेता आपल्या वेब सीरीजसाठी वापरलं. या पोस्टरसाठी माझ्या टीमनं १३ महिने मेहनत केली होती.' यानंतर ऑल्ट बालाजीनं आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत माफी मागितली. त्यांनी लिहिलं, '९ एप्रिलला आम्ही आगामी वेब सीरिज 'हिज स्टोरी'चं पोस्टर रिलीज केलं होतं आणि त्यावेळी आम्हाला हे पोस्टर या आधीच सुधांशू यांच्या 'लोएव' चित्रपटाचं असल्याचं समजलं. हे अशाप्रकारे पोस्टर तयार करणं आणि त्यात एवढं साम्य असणं हे चुकीचं आहे. हे आमच्या डिझाइन टीमचं काम होतं. आम्ही यासाठी माफी मागत आहोत.' याच पोस्टमध्ये पुढे लिहिण्यात आलं आहे की, 'आम्ही प्रत्येक डिझायनरच्या क्रिएटिव्हीटीचा आदर करतो. त्यांचा कामाचा आणि त्यांच्या कौशल्याचा जाणूनबुजून अपमान करत नाही. हे पोस्टर तयार करणाऱ्या प्रत्येक डिझायनरनं माफी मागितली आहे आणि आम्ही सर्व प्लॅटफॉर्मवरून हे पोस्टर डिलिट केलं आहे. आम्ही 'लोएव'च्या सर्व डिझायनरची माफी मागतो.' ही वेब सीरीज येत्या २५ एप्रिलला रिलीज होणार असून यात सत्यदीप मिश्रा, मृणाल दत्त आणि प्रियमणि राज मुख्य भूमिकेत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dVTiqL